

पुढारी ऑनलाईन डेस्क : ओबीसी, दलित आणि आदिवासींच्या आरक्षणाची मर्यादा कमी करून काँग्रेसला मुस्लिमांना आरक्षण द्यायचे आहे;पण देशात भाजप आहे, तोपर्यंत धर्मावर आधारित आरक्षण मिळणार नाही, अशा शब्दांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज (दि. ९) काँग्रेसवर हल्लाबोल केला. ते झारखंडमधील पायमु येथे आयोजित प्रचार सभेत बोलत होते.
यावेळी अमित शहा म्हणाले की, आज काँग्रेस आरक्षणाबाबत बोलत आहेत; पण भारतीय राज्यघटनेत धर्माच्या आधारे आरक्षण देण्याची तरतूद नाही. महाराष्ट्रात काही 'उलेमा'च्या गटाने मुस्लिमांना 10 टक्के आरक्षण देण्याबाबतचे निवेदन दिले. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, आम्ही त्यांना मदत करु. काँग्रेसला ओबीसी, दलित आणि आदिवासींच्या आरक्षणाची मर्यादा कमी करून मुस्लीमांना 10 टक्के आरक्षण द्यायचे आहे, असा आरोपही त्यांनी केला.
जोपर्यंत या देशात भाजप आहे तोपर्यंत देशात धर्मनिहाय आरक्षण दिले जाणार नाही. काँग्रेस जेव्हा सत्तेत आले त्यांनी ओबीसी समाजावर अन्याय करण्यात आला. काँग्रेस हा ओबीसी विरोधी पक्ष आहे. ओबीसी आरक्षणासाठी काका कालेलकर समिती 1950 मध्ये बनवली होती; पण त्याचा अहवाल गायब झाला. ओबीसींना आरक्षण देण्यासाठी मंडल आयोग आला तेव्हा राजीव गांधींनी विरोध केला. 2014 मध्ये जेव्हा जनतेने मोदींना निवडले तेव्हा त्यांना केंद्रीय संस्थांमध्ये 27 टक्के आरक्षण देण्यास राहुल गांधींनी विरोध केला. मोदी सरकारने ओबीसींना 27 टक्के आरक्षण लागू केले. तसेच राष्ट्रीय मागासवर्ग आयोग (NCBC) स्थापन केला आणि त्याला घटनात्मक स्थान दिले, असेही त्यांनी सांगितले.
झामुमो, काँग्रेस आणि राजदचे सरकार हे देशातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे. कोणी पाहिले आहे का? काँग्रेसच्या एका खासदाराच्या घरातून 300 कोटींहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली होती आलमगीर आलम राज्य सरकारमध्ये मंत्री असताना त्यांच्या पीएच्या घरातून 30 कोटी रुपये जप्त करण्यात आले होते, परंतु हेमंत सोरेन किंवा काँग्रेसने त्यांना काही केले नाही, हे झारखंडच्या तरुण आणि गरीबांचे आहे काँग्रेसवाल्यांनी खाल्ली आहे, तुम्ही राज्यात भाजपचे सरकार बनवले तर आम्ही भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.