

अमेठी : अमेठीमध्ये तरुणाने आपल्या पत्नीचे लग्न तिच्या प्रियकराशी लावून दिल्याची घटना चर्चेत आहे. कमरौली पोलिस ठाणे हद्दीतील सिंदूरवा गावातील रहिवासी शिवशंकरचा विवाह राणीगंज उत्तरगाव येथील उमासोबत 2 मार्च 2025 रोजी झाला होता.
दोन्ही कुटुंबांच्या उपस्थितीत सामाजिक आणि धार्मिक परंपरेनुसार हा विवाह पार पडला. लग्नानंतरही उमाचे मन तिच्या प्रियकरातच अडकले होते. उमा तिच्या प्रियकराशी फोनवर बोलत असे. सुरुवातीला, जेव्हा शिवशंकरला कळले की, त्याच्या पत्नीला एक प्रियकर आहे, तेव्हा त्याने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, उमाने तिच्या प्रियकरासोबत संबंध तोडण्यास नकार दिला. हळूहळू घरातील वातावरण बिघडत गेले आणि भांडणे वाढत गेली.
या गोष्टीला कंटाळून शिवशंकरने आपल्या पत्नीचे लग्न तिच्या प्रियकराशी लावण्याचा निर्णय घेतला. दोन्ही कुटुंबांच्या उपस्थितीत, एका मंदिरात उमाने तिच्या प्रियकराला हार घातला. त्यानंतर शिवशंकरने स्वतः त्याची पत्नी उमाला तिच्या प्रियकरासह निरोप दिला. ही घटना संपूर्ण गावात आणि परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. या अनोख्या लग्नामुळे बरीच चर्चा होत आहे.