अमेरिकेने लष्करी विमानाने १०४ भारतीयांना परत पाठवले

America Sends Indians Back : महाराष्ट्र आणि गुजरातमधील प्रत्येकी ३ जणांचा समावेश
America Sends Indians Back
प्रातिनिधीक छायाचित्रFile Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांना देशातून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या संदर्भात, बुधवारी १०४ भारतीय स्थलांतरितांना भारतात कैद्यांसारख्या बेड्या घालून परत पाठवण्यात आले. यासंबंधीचे व्हिडीओ देखील समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये भारतीयांच्या हाताला बेड्या दिसत आहेत, तसेच त्यांना कैद्यांप्रमाणे वागणूक दिली जात आहे. हे सर्वजण बेकायदेशीर स्थलांतरित असल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकन लष्करी विमान आज १०४ भारतीयांना अमृतसरला पोहोचले. टेक्सासमधील सॅन अँटोनियो येथून आलेल्या या विमानात पंजाबमधील ३०, हरियाणा आणि गुजरातमधील प्रत्येकी ३३, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील प्रत्येकी तीन आणि चंदीगडमधील दोघांचा समावेश होता. बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्धच्या कारवाईचा भाग म्हणून भारतीयांची अशा प्रकारची ही पहिलीच हद्दपारी आहे.

हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये २५ महिला आणि १२ अल्पवयीन मुलांचा समावेश होता. त्यापैकी सर्वात तरुण प्रवासी फक्त चार वर्षांचा आहे. ४८ लोक २५ वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. अमेरिका एकूण २०५ भारतीय स्थलांतरितांना हद्दपार करण्याची कारवाई करत आहे, त्यापैकी पहिले विमान १०४ भारतीयांना घेऊन अमृतसरला पोहोचले. प्यू रिसर्च सेंटरच्या आकडेवारीनुसार, भारतातील सुमारे ७ लाख २५ हजार बेकायदेशीर स्थलांतरित अमेरिकेत राहतात, ज्यामुळे मेक्सिको आणि एल साल्वाडोर नंतर अनधिकृत स्थलांतरितांची लोकसंख्या असलेला हा देश तिसरा सर्वात मोठा देश बनला आहे.

अमेरिकेने परत पाठवलेल्या या नागरिकांची प्राथमिक चौकशी केली. त्यांच्या कागदपत्रांची आणि ओळखपत्रांची सखोल पडताळणी केल्यानंतर, तसेच वैद्यकीय तपासणी केल्यानंतर, निर्वासितांना त्यांच्या संबंधित राज्यांमध्ये आणि मूळ गावी पाठवण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले. संबंधित राज्य सरकारांनी निर्वासितांना घरी नेण्यासाठी विशेष बसेसची व्यवस्था केली आहे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी बसेसमध्ये स्थानिक पोलिस कर्मचारी देखील तैनात केले आहेत. सूत्रांनी सांगितले की, महाराष्ट्र आणि गुजरातमधून येणाऱ्या भारतीय स्थलांतरितांना विमानाने त्यांच्या घरी पाठवले जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी अमेरिकेने उचलली पावले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी अमेरिकेतून कथित बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना हाकलून लावण्याची घटना घडली आहे. पंतप्रधान मोदी त्यांच्या दौऱ्यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांना भेटून इमिग्रेशनसह इतर मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. अलिकडच्याच एका निवेदनात ट्रम्प म्हणाले की, त्यांनी पंतप्रधान मोदींसोबत स्थलांतराबद्दल चर्चा केली.

लष्करी विमानाने भारतीयांना परतवण्याचा खर्च

भारतीयांना परत पाठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लष्करी विमानाचा खर्च प्रत्येक निर्वासित व्यक्तीसाठी किमान ४,६७५ डॉलर (४.०७ लाख रुपये) इतका असल्याचा अंदाज आहे. हा आकडा व्यावसायिक विमान कंपनीच्या प्रथम श्रेणीच्या तिकिटाच्या किमतीच्या पाचपट जास्त आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news