नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जवळ येत असताना सर्वच पक्षांनी जागावाटपासाठी आघाडी घेतली आहे. महाविकास आघाडीमध्येही जागा वाटपाच्या चर्चेला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. दरम्यान, यापूर्वीही महाविकास आघाडीने आघाडीतील घटक पक्षांनी जागावाटपासाठी आपापल्या पक्षाचे नेते ठरवले होते. या संदर्भात प्राथमिक चर्चाही झाल्या होत्या. त्यानंतर सोमवारपासून पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात होणार आहे. शक्यतो संपूर्ण जागावाटप राज्यातच होणार असल्याचेही समजते.
महाविकास आघाडीमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडी मधील जागावाटपासंदर्भात महत्वपूर्ण चर्चेला येत्या सोमवारपासून सुरुवात होईल. या चर्चांच्या बैठकीमध्ये तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. राज्यात जागावाटप करताना मेरिटच्या आधारे निर्णय घेतला जाणार असल्याचेही समजते. जिथे ज्या पक्षाची ताकद जास्त तिथे त्या पक्षाला उमेदवारी या निकषाखाली महाविकास आघाडीमध्ये जागावाटप होणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जागा वाटपाचा निर्णय आघाडीचे राज्यातील नेतेच घेणार आहेत. महाराष्ट्रातील जागावाटपा संदर्भात दिल्लीत बैठक घेण्याची गरज पडणार नाही, असेही महाविकास आघाडीमधील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.