संसदेत राजकीय पक्षांना कार्यालय वाटप

शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेला स्वतंत्र कार्यालय तर राष्ट्रवादीला एकच कार्यालय
India's Parliment
संसदेत राजकीय पक्षांना कार्यालय वाटपPudhari File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-

संसदेत विविध राजकीय पक्षांना कार्यालये वाटप करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील शिवसेना शिंदे गटाला आणि ठाकरे गटाला स्वतंत्र कार्यालय देण्यात आले आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मात्र एकच कार्यालय देण्यात आले आहे.

11 पक्षांना कार्यालय वाटप

लोकसभा सचिवालयाने दिलेल्या माहितीनुसार ११ राजकीय पक्षांना कार्यालयाचे वाटप करण्यात आले. यामध्ये समाजवादी पक्ष, संयुक्त जनता दल, तेलगू देसम पक्ष, वायएसआर काँग्रेस, आम आदमी पक्ष, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रीय जनता दल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, बिजू जनता दल या पक्षांचा समावेश आहे.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी एकच कार्यालय?

संसद सचिवालयाच्या वतीने राजकीय पक्षांना कार्यालय वाटप करण्यात आले. यामध्ये शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट यांना स्वतंत्र कार्यालय देण्यात आले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या नावाने एकच कार्यालय देण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे खासदार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे खासदार एकाच ठिकाणी बसून कार्यालयीन कामकाज करणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचाच असल्याचा निकाल दिला. लोकसभेच्या निवडणुकाही अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या नावाने आणि घड्याळ या चिन्हासह लढवल्या. असे असले तरी आकड्यांचे गणित पाहता शरद पवार गटाकडे जास्त खासदार आहेत. त्यामुळे कार्यालयावर नक्की कोणाचा ताबा असणार यावरून आता संभ्रम निर्माण झाला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news