आजपासून दिल्‍लीतील सर्व शाळा बंद, मुख्यमंत्री आतिशींनी सांगितले कारण

पुढच्या आदेशापर्यंत ऑनलाईन वर्गांचे आयोजन
all schools in delhi are closed from today cm atishi told the reason
आजपासून दिल्‍लीतील सर्व शाळा बंद, मुख्यमंत्री आतिशींनी सांगितले कारणFile Photo
Published on: 
Updated on: 

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन

दिल्‍लीतील शाळेंचे ५ वी पर्यंतचे वर्ग आजपासून बंद ठेवण्यात येणार आहेत. दिल्‍लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांनी या विषयी गुरूवारी माहिती दिली. त्‍यांनी त्‍यांच्या एक्‍स अकाउंटवर माहिती देताना सांगितले की, राज्‍यातील वाढत्‍या हवा प्रदूषणाची समस्‍या पाहता पुढच्या आदेशापर्यंत दिल्‍लीतील इयत्‍ता ५ वी पर्यंतच्या सर्व शाळा बंद राहणार आहेत. या दरम्‍यान विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग घेण्यात येणार असल्‍याची माहिती त्‍यांनी दिली आहे. प्रदूषणाने धोकादायक पातळी गाठल्यानंतर केंद्रीय प्रदूषण निरीक्षण संस्था CAQM ने आज (शुक्रवार) पासून दिल्ली-NCR मध्ये GRAP-3 अंतर्गत निर्बंध लादले आहेत.

दिल्‍लीतील हवेची गुणवत्‍ता सलग दुसऱ्या दिवशीही 'गभीर' श्रेणीत राहिली. ज्‍यामुळे अधिकाऱ्यांना हवा प्रदूषण रोखण्यासाठी कडक पावले उचलावी लागली. आज (शुक्रवार) पासून अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. शिक्षण खात्‍याचा कार्यभार सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री आतिशी यांनी एक्‍सवरील त्‍यांच्या पोस्‍टमध्ये म्‍हंटलंय की, वाढत्‍या प्रदूषणामुळे दिल्‍लीतील सर्व प्राथमिक शाळा पुढच्या आदेशापर्यंत ऑनलाईन पद्धतीनेच चालविल्‍या जातील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news