shocking incident: सासूची पळापळी... आधी होणाऱ्या जावयासोबत आता मेहुण्यासोबत पळून गेली; जाता जाता राहुलला मोठा धक्काही दिला

हिच्यासाठी मी माझं घर सोडलं, समाजाची बोलणी खाल्ली, आता तीच मला सोडून गेली.
Aligarh mother in law son in law love story
Aligarh mother in law son in law love storypudhari photo
Published on
Updated on

Aligarh mother in law son in law love story: गेल्या वर्षी अलीगढमधील एक सासूबाई या आपल्या होणाऱ्या जावयासोबत पळून गेल्या होत्या. ज्या सासूबाई सावयासोबत पळून गेल्या त्या आता पुन्हा चर्चेत आल्या आहेत. बिहारमध्ये जवळपास १० महिने आपल्या होणाऱ्या जावयासोबत पती पत्नी सारखा संसार केल्यानंतर आता या सासूबाईंनी जावयाला देखील जोर का झटका दिला आहे. त्या आता त्यांच्या मेहुण्यासोबत पळून गेल्या आहेत. जाता जाता त्यांनी जावयाचा पती झालेल्या राहुलला मोठा झटका देखील दिला आहे. त्या जाताना एकट्या नाही तर सोबत २ लाख रूपये कॅश आणि सोन्याचे दागिने देखील घेऊन गेल्या आहेत.

आता हा अभागा राहुल पोलिस ठाण्यात पोहोचला असून त्यानं अलीगढमध्ये तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी आता ही केस बिहारची आहे असं म्हणत हात वर केले आहेत. नात्यांच्या गुंत्यात अडकलेली ही कहानी आता पुन्हा एका नव्या वळणावर येऊन ठेपली आहे.

मुलीच्या लग्नावेळी काय किस्सा झाला?

हा सगळा पळून जाण्याचा कार्यक्रम एप्रिल २०२५ मध्ये सुरू झाला. १६ एप्रिल रोजी या महिलेच्या मुलीचे लग्न ठरलं होत. घरात रंग रंगोटी आणि नातेवाईकांचे येणे - जाणे सुरू होते. लग्नाला अवघे १२ दिवस शिल्लक होते. तेवढ्यात ज्या राहुल नावाच्या तरूणासोबत या मुलीचे लग्न होणार होते. त्या मुलीची आई म्हणजे राहुलची होणारी सासू राहुलसोबत पळून गेली. त्यावेळी सासूबाई आपल्यासोबत लाखो रूपयांचे दागिने आणि कॅश घेऊन गेल्याचा आरोप झाला होता. कुटुंबियांनी जवळपास ५ लाखाचे दागिने आणि साडेतीनलाख रूपये कॅश गायब झाल्याचा आरोप केला होता. त्यावेळी जिच्यासोबत राहुलचे लग्न होणार होते त्या मुलीने माध्यमांशी बोलताना सांगितलं की माझी आई घरात १० रूपये देखील सोडून गेलेली नाही.

मोबाईलमुळं जवळीक वाढली

कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार राहुलने आपल्या होणाऱ्या सासूला स्मार्टफोन घेऊन दिला होता. दोघांमध्ये हळूहळू संभाषण वाढत गेलं. आधी लग्नाच्या तयारीचा बहाणा करून बोलणं होत होतं. त्यानंतर तासंतास फोन कॉल सुरू झाले. या महिलेचे पती जितेंद्र यांनी आरोप केला की ज्यावेळी लग्नाच्या तयारीबाबत त्याचं घरी येणं जाणं वाढळं त्यावेळी जितेंद्रची पत्नी आणि राहुल यांच्यात जवळपास १५ ते २० तास फोनवरून संभाषण होत होतं. आधी हे सर्व सामान्य वाटलं मात्र नंतर शंका वाढत गेली.

कुठं कठुं पळून गेले

ज्यावेळी हे प्रकरण प्रकाशझोतात आलं त्यावेळी हे दोघे अलीगढमधून कासगंज, बरेली मार्गे बिहारमधील मुजफ्फरपूरमध्ये पोहचले. काही दिवस ते तिथं थांबले. त्यानंतर त्यांनी नेपाळ बॉर्डरकडे जाण्याचं प्लॅनिंग केलं होतं. मात्र ज्यावेळी राहुलने आपला मोबाईल सुरू केला अन् सोशल मीडियावर आपले फोटो व्हायरल झाल्याचे पाहिले त्यावेळी त्यांनी परतण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मुजफ्फरपूरमधून बस पकडली आणि उत्तर प्रदेशात परतले. त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन आत्मसर्पण केलं होतं.

आल्यानंतर काय सांगितलं?

पोलीस ठाण्यात आत्मसर्पण केल्यानंतर सासूने कुटुंबियांवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता. पती दारू पिऊन तिला मारहाण करतो, अपमानित करतो घरातून हाकलून देण्याची धमकी दे होता असा आरोप केला. राहुल ज्यावेळी फोन करत होता त्यावेळी तिची मुलगी बोलत असायची कधी कधीच ती राहुल सोबत बोलत होती. मात्र घरातील वाद वाढत गेला. पती टोमणे मारत होता. तू राहुल सोबतच पळून जा असं म्हणत होता.

ज्यावेळी हे सर्व सहन झालं नाही त्यानंतर तिनं जे तिला योग्य वाटलं ते तिनं केलं असं पोलिसांना सांगितलं. राहुलने या महिलेला आधीपासून ओळखत असल्याचं सांगितलं. त्या महिलेने सांगितल्यानंतरच तो तिच्यासोबत गेल्याचा त्याने दावा केला होता. ती महिला रडत म्हणायची की मला आता जगायचं नाही. मला वाटलं त्यावेळी तिला एकटीला सोडणं बरोबर नाही. यानंतर पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत त्या महिलेला राहुल सोबत जाण्याची परवानगी दिली.

१० महिन्यानंतर वेगळाच सीन

जवळपास १० महिने राहुल आणि ही महिला बिहारमध्ये एकत्र राहिले. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल आणि ही महिला पती पत्नीसारखे रहात होते. मात्र आता राहुलने आरोप केला आहे की ही महिला आता मला साडून तिच्या मेहुण्यासोबत गेली आहे. राहुलने दावा केला आहे की, जाताना ही महिला दोन लाख रूपये कॅश आणि काही दागिने देखील सोबत घेऊन गेली आहे. राहुल म्हणाला हिच्यासाठी मी माझं घर सोडलं, समाजाची बोलणी खाल्ली, आता तीच मला सोडून गेली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news