Al Falah University | ‘अल फलाह’चे भवितव्य अधांतरी; विद्यार्थ्यांना प्रतीक्षा ‘क्लीन चिट’ची

अल फलाह विद्यापीठात शिकताहेत महाराष्ट्रातील 4 विद्यार्थी
Al Falah University
Al Falah University | ‘अल फलाह’चे भवितव्य अधांतरी; विद्यार्थ्यांना प्रतीक्षा ‘क्लीन चिट’ची
Published on
Updated on

फरिदाबाद (हरियाणा) : दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अल फलाह विद्यापीठ एका निर्णायक वळणावर उभे आहे. एका बाजूला आशा, विकास आणि उपचारांचे केंद्र आहे, तर दुसरीकडे, विद्यापीठाचे वर्तमान, भीती, संशय आणि स्फोटाच्या तपासाचे दडपण आहे. गेटबाहेर उभे असलेले दुकानदार, आत रिकामे वॉर्ड आणि एक उजाड कॅम्पस - हे फक्त द़ृश्य नाही, तर संपूर्ण परिसरातील बदललेल्या जीवनाचे प्रतिबिंब आहे. सध्या तरी अनेक प्रश्न पडतात, ही शांतता तात्पुरती आहे का? पुन्हा रुग्ण येतील का? विद्यार्थी येथे अभ्यास करण्यासाठी परततील का? विद्यापीठावरील विश्वास पुनर्संचयित होईल का? आता, अल फलाह विद्यापीठ शांततेत उभे असून, पुढे काय होते? ते पाहण्याची वाट पाहत आहे.

विद्यापीठात उभे राहून, आपल्याला जाणवते की, समृद्धीचा अर्थ कधीही केवळ नावांमध्ये दडलेला नसतो, तर एखाद्या ठिकाणावर लोकांनी ठेवलेल्या विश्वासात असतो. ‘अल फलाह’च्या बाबतीत मात्र सध्या त्या विश्वासावरच संशयाचे ढग दाटले आहेत.

विद्यार्थ्यांची स्वप्ने अनिश्चित भविष्याच्या उंबरठ्यावर

अल फलाह विद्यापीठात पुढे जाताना, आपल्याला लांब, शांत वसतिगृहाच्या इमारती दिसतात. कॉरिडोरमध्ये एकेकाळी प्रतिध्वनित होणारा गोंगाट आता क्षीण झाला आहे. वर्ग खोल्या बंद आहेत, बाल्कनी शांत आणि नोटीस बोर्डावर जुन्या सूचना टांगलेल्या आहेत, जणू काही वेळ थांबला आहे. या शांततेत, आणखी एक सत्य समोर येते, ते म्हणजे येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी हे देशभरातून आलेले आहेत. त्यांनी डॉक्टर बनण्याचे स्वप्न घेऊन आपले घर सोडले आणि ‘अल फलाह’मध्ये प्रवेश घेतला. विद्यार्थ्यांमध्ये काश्मीरमधील मुलांची संख्या जास्त आहे. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश, हरियाणा आणि दिल्लीमधून आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे; तर महाराष्ट्रातीलदेखील चार विद्यार्थी येथे वैद्यकीय शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांपैकी एकाने काही महिन्यांपूर्वीच पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो इथे आला होता; पण आता, ते स्वप्न भिंतीत अडकलेले दिसते.

विद्यापीठाच्या मान्यतेचे वास्तव काय?

जेव्हा एखाद्या विद्यापीठाचे नाव तपास आणि स्फोटांच्या बातम्यांशी जोडले जाते, तेव्हा पहिला प्रश्न उद्भवतो की, त्याची मान्यता सुरक्षित आहे का? पण जमिनीवरील वास्तव आपल्याला काहीतरी वेगळेच सांगते. ‘यूजीसी’ आणि ‘एनएएसी’शी संलग्न अल फलाह स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी 2018 मध्ये बंद करण्यात आले. याचा अर्थ असा की, मान्यता गमावल्याबद्दल बोलले जाणारे अभ्यासक्रम आता कार्यरत नाहीत. परिणामी, विद्यापीठावर ‘यूजीसी’ किंवा ‘एनएएसी’कडून कोणतीही मोठी कारवाई होण्याची शक्यता जवळजवळ शून्य दिसते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एमबीबीएस आणि पीजी अभ्यासक्रम चालवल्या जाणार्‍या मेडिकल अँड रिसर्च सेंटरला राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने (एनएमसी) मान्यता दिली आहे. याच आधारावर 800 एमबीबीएस आणि अंदाजे 90 पीजी विद्यार्थी विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. विद्यापीठाला वन विभागाकडून एक नोटीस मिळाली आहे; परंतु ती जमीन आणि बांधकामाच्या मुद्द्यांशी संबंधित आहे. व्यवस्थापनाच्या जवळच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, दंड भरल्यानंतर ही अडचण सोडवली जाईल. दुसर्‍या शब्दांत सांगायचे, तर प्रश्न महत्त्वाचे आहेत; परंतु मान्यता प्रक्रिया अखंड आहे.

दुमजली घरावर नजर

फतेहपूर रोडच्या डाव्या बाजूला, अल फलाह विद्यापीठाच्या दिशेने, धौज गावातील एका पिवळ्या दुमजली सर्वांच्याच नजरा आपसूकच वळतात. या घरातून 358 किलोगॅ्रम अमोनियम नायट्रेट स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. हे घर दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाशी जोडलेले आहे का? घराच्या दारावर एक नंबर लिहिलेला आहे. घरात एकूण आठ खोल्या आहेत. सामान्यतः, इतर राज्यांमधून फरिदाबादमध्ये काम करण्यासाठी येणारे कामगार धौज शहरातील या घरात एक खोली भाड्याने घेतली होती. अल फलाह स्कूल ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर अँड हॉस्पिटलचा डॉ. मुझम्मिल याने दोन महिन्यांसाठी खोली क्रमांक 15 भाड्याने घेतली होती. घराचे मालक, वृद्ध हाजी मद्रासी, पश्चात्तापी आहेत. 13 सप्टेंबर रोजी, तो आला आणि म्हणाला की, त्याला घर हवे आहे. मी त्याला ते दिले. त्याने दोन महिन्यांचे भाडे 2,400 रुपये आगाऊ दिले. त्यानंतर, त्याने दरवाजा बंद केला आणि पळून गेला. रुग्णालयात वसतिगृह मिळताच तो घर सोडेल, असे त्याने सांगितले. जेव्हा इतर राज्यांमधून भाडेकरू येतात तेव्हा मी पोलिस पडताळणीसाठी जातो. मी या प्रकरणात गेलो नाही. त्याने डॉक्टरांनी दिलेली कागदपत्रे दाखवली. 13 सप्टेंबर ते 13 नोव्हेंबरपर्यंत भाडे दिले गेले. ‘अल फलाह’ फरिदाबादच्या धौज शहरात आहे, हाजी मद्रासीच्या घरापासून ‘वॉकिंग डिस्टन्स’वर आहे.

समाप्त

‘अल फलाह’ला त्याचा पूर्वीचा आत्मविश्वास परत मिळेल का?

विद्यार्थ्यांची स्वप्ने पुन्हा एकदा पांढर्‍या अ‍ॅप्रन आणि स्टेथोस्कोपची चमक पाहतील का? आतापुरते, 73 एकरचा हा परिसर केवळ इमारतींचा संग्रह नाही तर बंद दरवाजे, थांबलेले हृदयाचे ठोके आणि वाट पाहण्याची एक दीर्घ कहाणी बनला आहे. त्याचा पुढचा अध्याय अजून लिहायचा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news