

नवी दिल्ली : ‘ज्याच्या पोटात दुखते, तोच ओवा मागतो,’ अशी एक जुनी म्हण आपल्याकडे आहे. पोटाच्या समस्येवर ओवा गुणकारी असल्याचे आपल्याकडे पूर्वीपासूनच सर्वांना ठाऊक आहे आणि आधुनिक काळात तज्ज्ञही तेच सांगतात. थंडीचे दिवस सुरू होताच पोटाशी संबंधित त्रास, जसे की गॅस, जडपणा, अपचन आणि ॲसिडिटी, वाढू लागतात. अशावेळी स्वयंपाकघरातील ओवा उपयोगी पडतो.
ओवा थंडीत शरीराला ऊब देतो आणि पचनसंस्थेला मजबूत बनवतो. गॅस, अपचन, ॲसिडिटी आणि जडपणा यापासून ओवा त्वरित आराम देतो. ओव्याच्या सेवनाने पोटातील वेदना आणि पेटके कमी होतात. ओव्यामध्ये थायमोल नावाचा एक विशेष घटक असतो, जो पचन एन्झाईम सक्रिय करतो, याच कारणामुळे गॅस किंवा ॲसिडिटी लगेच कमी होते.