Ajay Seth | अजय सेठ भारताचे नवे वित्त सचिव 

हार्वर्ड विद्यापीठातून सार्वजनिक प्रशासनात पदव्युत्तर पदवी
Ajay Seth
भारताचे नवे वित्त सचिव म्हणून अजय सेठ यांची नियुक्ती केली आहे.Pudhari Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा:  कर्नाटक केडरचे १९८७ च्या बॅचचे आयएएस अधिकारी अजय सेठ यांची भारताचे नवे वित्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते आर्थिक व्यवहार विभागात सचिव म्हणून काम करत होते. वित्त सचिव म्हणून कार्यरत असलेले तुहिन कांता पांडे यांची सेबीच्या अध्यक्षपदी बढती झाल्यानंतर अजय सेठ (Ajay Seth) यांची नवीन वित्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (Finance Secretary of India)

सेठ एक अनुभवी प्रशासक आहेत. त्यांना वित्त, सार्वजनिक धोरण आणि प्रशासनातील चांगला अनुभव आहे. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून सार्वजनिक प्रशासनात पदव्युत्तर पदवी तसेच भौतिकशास्त्र आणि व्यवसाय प्रशासनात पदव्या घेतल्या आहेत. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news