पुढारी ऑनलाईन डेस्क : एअर मार्शल अमर प्रीत सिंग ( Amar Preet Singh) यांची भारतीय हवाई दल प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी ३० सप्टेंबर रोजी निवृत्त होत आहेत.
भारतीय हवाई दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेले अमर प्रीत सिंग हे १९८४ मध्ये हवाई दलात दाखल झाले. सध्या भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख आहेत. एअर मार्शल अमर प्रीत सिंग हे ३० सप्टेंबरच्या दुपारपासून हवाई दलाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.
एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांनी ऑपरेशनल फायटर स्क्वॉड्रन आणि फ्रंटलाइन एअर बेसचे नेतृत्व केले आहे. चाचणी पायलट म्हणून, त्यांनी मॉस्कोमध्ये मिग-29 फायटर अपग्रेड प्रोजेक्ट मॅनेजमेंट टीमचे नेतृत्व केले आहे. स्वदेशी बनावटीच्या तेजस लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्टचे प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणूनही त्यांनी जबाबदारी संभाळली आहे.