

पुढारी ऑनलाईन डेस्क : अहमदाबाद वडोदरा एक्स्प्रेस हायवेवर मंगळवारी (दि.3) रात्री उशिरा ट्रकने कारला धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एका अल्पवयीन मुलीसह 2 जण जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती वृत्तसंस्था 'एएनआय'ने त्यांच्या सोशल मिडिया हँडलवर दिली आहे.
या बद्दल पोलीस निरीक्षक व्ही.बी.देसाई यांनी सांगितले कि, "या अपघातात दोन पुरुष आणि एका महिलेचा मृत्यू झाला. एक 41 वर्षीय व्यक्ती जिम फुलाराम आणि एक 14 वर्षांची मुलगी रुग्णालयात दाखल आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे सर्व लोक एका लग्न समारंभातून सुरतला परतत असताना अहमदाबादवडोदरा एक्सप्रेस हायवेवर नडियादजवळ हा अपघात झाला. कारचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.