Suitcase Body Case : ट्रेनमध्‍ये आढळले महिलेच्‍या मृतदेहाचे तुकडे, CCTVच्या आधारे पोलिस पोहोचले 'हाऊस ऑफ हॉरर'मध्ये

बिर्याणीच्या भांड्यात ठेवले होते मृतदेहाचे उर्वरित तुकडे
Agra train suitcase body case
Published on
Updated on

Agra train suitcase body case : उत्तर प्रदेशमधील आगा्र येथे ६ ऑगस्ट ट्रेनमध्ये लाल रंगाच्या सुटकेसमध्ये एका महिलेच्या शरीराचे तुकडे आढळल्याच्या धक्कादायक घटनेचा तपास आता चेन्नईपर्यंत पोहोचला आहे. पोलिस तपासात सीसीटीव्ही फुटेज, रेल्वेचे रेकॉर्ड आणि फॉरेन्सिक अहवाल महत्त्वाचे दुवे ठरत असून, पोलिस संशयित आरोपींच्या चेन्नईतील भाड्याच्या घरापर्यंत पोहोचले असून, येथे हा भयंकर गुन्‍हा झाल्‍याचा संशय व्‍यक्‍त होत आहे. संपूर्ण घराची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

बिर्याणीच्या भांड्यात ठेवले होते मृतदेहाचे उर्वरित तुकडे

प्राथमिक तपासानुसार, आरोपींनी चेन्नईतील भाड्याच्या घरात महिलेची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे केल्याचा संशय आहे. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून अंगाचा थरकाप उडवणारे पुरावे हस्तगत केले आहेत. पीडित महिलेच्या शरीराचा काही भाग छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला, तर उर्वरित अवशेष बिर्याणी बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एका मोठ्या भांड्यात ठेवण्यात आले होते. हे भांडे पोलिसांनी जप्त केले असून संपूर्ण घराची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

Agra train suitcase body case
Shocking Lift Accident : लिफ्टचा अंगावर काटा आणणारा अपघात! दार उघडे असतानाच अचानक गेली खाली; महिलेचा दुर्दैवी मृत्यू

सीसीटीव्ही फुटेजवरून संशयित जोडप्याचा सुगावा

चेन्नई सेंट्रल रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक पुरुष आणि महिला ती लाल सुटकेस घेऊन जाताना स्पष्ट दिसत आहेत. त्यांनी ही सुटकेस आग्राकडे जाणाऱ्या 'तमिळनाडू एक्सप्रेस'मध्ये सोडली आणि तेथून पळ काढला. या फुटेजच्या मदतीने पोलिसांनी गुदुवांचेरी भागातील त्यांच्या भाड्याच्या घराचा शोध घेतला. मात्र, या संशयित आरोपींची ओळख आणि त्यांचे परस्परांशी असलेले नाते अजून स्पष्ट झालेले नाही.

Agra train suitcase body case
Crime News : २७ वेळा चाकूने भोसकून मुख्याध्यापिकेची हत्या ; 'बाबू' शब्दाने उघड केले १० वीच्या विद्यार्थ्यांचे भयंकर कृत्य!

सुटकेसमध्‍ये आढळला कुजलेल्‍या अवस्‍थेतील मानवी अवशेष

६ ऑगस्ट रोजी आग्रा कॅन्ट रेल्वे स्टेशनवर तमिळनाडू एक्सप्रेसच्या जनरल डब्यात एक संशयास्पद पिशवी असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळाली होती. सुटकेसमधून काही भाग बाहेर आल्याचे दिसल्यानंतर पोलिसांनी ती उघडली असता, त्यात कुजलेल्या अवस्थेतील मानवी अवशेष आढळून आले होते.

Agra train suitcase body case
Omar Abdullah : "माझा बाप कोण आहे..."ची ही नवी आवृत्ती; 'आम्ही Gen Z आहोत' व्‍हायरल व्हिडिओवर CM ओमर अब्दुल्ला भडकले!

'चेन्नई' नाव लिहिलेली प्लास्टिक पिशवी ठरली मुख्य दुवा

सुटकेसच्या आत 'चेन्नई' असे नाव छापलेली एक प्लास्टिक पिशवी सापडली होती. याच सुगाव्याच्या आधारे पोलिसांनी चेन्नई सेंट्रल स्टेशन आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच रेल्वे प्रवासाच्या नोंदी तपासण्यास सुरुवात केली. सध्या मृतदेहाचे अवशेष शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, त्याद्वारे मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पीडित महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलिस बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींची छाननी करत आहेत. या भयंकर हत्येमागील कारण आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक कसून तपास करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news