Rohit Sharma Retirement: विराट पाठोपाठ कर्णधार रोहितनेही केली टी-20 मधून निवृत्तीची घोषणा !

विश्वचषकाच्या विजयानंतर रोहितचा टी-20 क्रिकेटमधून संन्यास
After Virat, captain Rohit also announced his retirement from T20!
विश्वचषकाच्या विजयानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने टी-20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.ICC 'X" Handle
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : टी-20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करून भारतीय संघ दुसऱ्यांदा चॅम्पियन बनला आहे. दरम्यान सामन्यानंतर झालेल्या सादरीकरणात कोहलीने हा आपला शेवटचा विश्वचषक असल्याचे जाहीर केले. एकप्रकारे त्याने निवृत्तीचे संकेत देऊन चाहत्यांना धक्का दिला आहे. या धक्क्यातून चाहते सावरतच होते. तोवर भारताचा कर्णधार रोहित शर्मानेसुद्धा क्रिकेटच्या सर्वात छोट्या फॉर्मटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे.

कर्णधार रोहितने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, रोहित शर्मानेही टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. राहुल द्रविडने पत्रकार परिषदेत निवृत्ती जाहीर केली. रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय T20 मधून निवृत्ती जाहीर केली आहे.

After Virat, captain Rohit also announced his retirement from T20!
Virat Kohli Retirement : कोहलची निवृत्तीची घोषणा! म्हणाला, ‘ही माझी शेवटची टी-20..’

रोहित शर्माने भारतासाठी 159 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 32.05 च्या सरासरीने आणि 140.89 च्या स्ट्राइक रेटने 4231 धावा केल्या आहेत. रोहित शर्माच्या नावावर T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5 शतके आणि 32 अर्धशतके आहेत. रोहित शर्मा 2007 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा एक भाग होता. भारतासाठी दोन T20 विश्वचषक जिंकणारा रोहित हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. याशिवाय रोहित शर्मा हा जगातील एकमेव असा क्रिकेटपटू आहे. ज्याने खेळाडू म्हणून आणि नंतर कर्णधार म्हणून टी-20 विश्वचषक जिंकला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news