दिल्ली : दीड महिन्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या चार हजारांच्या खाली

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

देशाची राजधानी दिल्लीमधले कोरोनाचे संकट हळूहळू कमी होत चालले असून तब्बल दीड महिन्यानंतर कोरोना रुग्णांची दैनिक संख्या चार हजारांच्या खाली नोंदवली गेली आहे. गेल्या चोवीस तासात कोरोनाचे 3 हजार 846 रूग्ण सापडले आहेत. याच कालावधीत 235 लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य खात्याकडून देण्यात आली. 

चोवीस तासात बरे झालेल्या लोकांची संख्या 9 हजार 427 इतकी आहे. कोरोनाचा पॉझिटिव्हीटी दर 5.78 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. ताज्या आकडेवारीनंतर कोरोना रुग्णांची एकूण संख्या 14 लाख 6 हजार 719 वर गेली आहे तर बरे झालेल्या लोकांची संख्या 13 लाख 39 हजार 326 वर गेली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 45 हजार 47 इतकी आहे. याआधी 5 एप्रिल रोजी दिल्लीत कोरोना रुग्णांची दैनिक संख्या पाच हजारांच्या खाली आली होती. त्यावेळी पॉझिटिव्हीटी दर 5.54 टक्के इतका होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news