पुढारी ऑनलाईन डेस्क : आसाम तृणमूल काँग्रेसचे (TMC) माजी प्रदेशाध्यक्ष रिपुन बोरा (Ripun Bora) यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आपण भाजपविरोधात लढा देण्यासाठी पक्षांतर केले असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर रिपुन बोरा म्हणाले की, "काँग्रेस हे माझे जुने घर आहे. आज आज मी माझ्या घरी परतलो आहे. मी दोन वर्षे तृणमूलमध्ये होतो. सध्या आसाम आणि संपूर्ण देशात जे वातावरणात बदल करणे ही काळाची गरज आहे. भ्रष्ट, फॅसिस्ट आणि लोकविरोधी भाजपच्या विरोधात एकजूटीसाठी तृणमूल काँग्रेसच्याच्या (टीएमसी) 36 पदाधिकाऱ्यांसह मी काँग्रेसमध्ये सामील झालो आहे."
ईशान्येकडील राज्यातील लोक तृणमूल काँग्रेस पक्षाला पश्चिम बंगालचा 'प्रादेशिक पक्ष' मानतात. ते आपला पक्ष म्हणून स्वीकारण्यास तयार नाहीत, असा दावा करत १ सप्टेंबर २०२४ रोजी रिपुन बोरा (Ripun Bora) यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे आसाममध्ये तृणमूल काँग्रेस मजबूत करण्यासाठी आपण अनेक सूचना केल्या होत्या. मात्र मी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी झालेली नाही, असा दावाही त्यांनी त्यावेळी केला होता.
2022 मध्ये मी तृणमूल काँग्रेसमध्ये सहभागी झालो. ममता बॅनर्जी यांच्या धडाडीच्या नेतृत्वामुळे मी प्रभावित झालो होतो. ममता बॅनर्जी ज्या पद्धतीने पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विरोधात लढत होत्या. भाजपला रोखण्यात खूप यश आले.मला वाटले की तृणमूल काँग्रेसच्या व्यासपीठावरून आसाममध्ये भाजपविरोधातील लढा अधिक तीव्र करू शकतो; पण नंतर मला अनुभव आला की आसाममधील लोक तृणमूलला स्वीकारण्यास इच्छुक नाहीत. आसामचे लोक या पक्षाला बंगालचा प्रादेशिक पक्ष मानतात. यात काही शंका नाही की, आसामचे लोक तृणमूल काँग्रेस पक्षाला स्वीकारायचे नाहीत हे मान्य नाही; मग आम्ही तृणमूलच्या माध्यमातून भाजपविरुद्धची लढाई कशी तीव्र करू शकतो, असा सवालही त्यांनी यावेळी केला होता.