स्वातंत्र्य दिन सोहळ्यात दहा वर्षांनंतर विरोधी पक्षनेत्याचा सहभाग

Independence Day 2024 : लाल किल्ल्यावरील सोहळ्यास राहुल गांधींची हजेरी
 Independence Day 2024
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज (१५ ऑगस्ट) लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला हजेरी लावली.ANI Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज (१५ ऑगस्ट) लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला हजेरी लावली. या कार्यक्रमाला हजेरी लावणारे लोकसभेतील 10 वर्षांतील ते पहिले विरोधी पक्षनेते ठरले. कारण गेली दहा वर्ष हे पद रिक्त होते. ( Independence Day 2024 )

विरोधी पक्षांचे संख्‍याबळ कमी असल्‍याने २०१४ ते २०२४ या काळात लोकसभा विरोधी पक्षनेतेपद कोणीही भूषवले नव्‍हते. यंदाच्‍या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस खासदारांची संख्‍या ९९ झाली. यानंतर 25 जून रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आले होते.

लाल किल्ल्यावरील सोहळ्यात राहुल गांधी पांढरा कुर्ता सूट परिधान केला होता. ते ऑलिम्‍पिक विजेत्यांसोबतमनू भाकर , सरबज्योत सिंग आणि पीआर श्रीजेश यांच्‍यासमवेत बसलेले दिसले.दरम्‍यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यंदाचे सलग 11वे स्वातंत्र्यदिनाचे भाषण ठरले. तसेच त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील हे पहिले भाषण होते. केंद्र सरकार मोठ्या सुधारणांसाठी वचनबद्ध असल्‍याचे प्रतिपादनही त्‍यांनी यावेळी केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news