राजकीय पक्षांना 'कॉर्पोरेट'कडून सर्वाधिक देणग्या! 'हे' ठरले टॉप देणगीदार

'ADR'ने जारी केला नवा अहवाल : सर्वाधिक देगणी भाजपला, दुसर्‍या स्‍थानी काँगेस
राजकीय पक्षांना 'कॉर्पोरेट'कडून सर्वाधिक देणग्या! 'हे' ठरले टॉप देणगीदार
( Image Source X )
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पुढारी ऑनलाईन डेस्‍क : निवडणूक आयोगाने विविध राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांची घोषणा या पूर्वीच केली आहे. आता २०२३-२४ या आर्थिक वर्षात राजकीय पक्षांना २०,००० रुपयांपेक्षा जास्त मिळालेल्या देणग्यांच्या निवडणूक आयोगाच्या आकडेवारीचे विश्‍लेषण करणारा अहवाल असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स(ADR)ने आज (दि. ७) जारी केला आहे. ( ADR report )

Pudhari

भाजप ठरला सर्वाधिक देणगी मिळवणारा पक्ष

राष्ट्रीय पक्षांमध्ये भाजप, काँग्रेस, बहुजन समाज पक्ष (बसपा), आम आदमी पक्ष (आप), कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) (माकपा) आणि नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीईपी) यांचा समावेश आहे. 'एडीआर' अहवालातील माहितीनुसार, भारतीय जनता पक्ष (भाजप) आर्थिक वर्षात निवडणूक देणग्यांमध्ये सर्वाधिक देणगी मिळवणारा पक्ष ठरला आहे. भाजपला ८,३५८ देणग्यांमधून २२४३.९४७ कोटी रुपये देणगी मिळाली आहे. २८१.४८ कोटी रुपये देणगी रुपात मिळवत काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात भाजपने घोषित केलेल्या देणग्या काँग्रेस, आप, एनपीईपी आणि सीपीआय(एम) यांनी घोषित केलेल्या एकूण देणग्यांच्या सहापट अधिक होत्‍या.

Pudhari

कॉर्पोरेट क्षेत्राकडून सर्वाधिक देणग्या

एडीआर अहवालात असे म्हटले आहे की, राष्ट्रीय पक्षांना सर्वाधिक (३,७५५ देणग्या) कॉर्पोरेट/व्यवसाय क्षेत्रांनी दिल्या आहे. ही रक्कम २२६२.५ कोटी रुपये (एकूण देणग्यांच्या ८८.९%) रुपये इतकी आहे. एकूण कॉर्पोरेट देणग्यांपैकी भाजपला सर्वाधिक देणग्या मिळाल्या आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात कॉर्पोरेट/व्यवसाय क्षेत्रांकडून भाजपला ३,४७८ देणग्या [२०६४.५८ कोटी रुपये], तर ४,६२८ वैयक्तिक देणगीदारांनी पक्षाला १६९.१२६ कोटी देणगी मिळाली आहे. दरम्यान, काँग्रेसला एकूण आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये कॉर्पोरेट/व्यावसायिक क्षेत्रांकडून १९०.३ कोटी रुपये आणि १,८८२ वैयक्तिक देणगीदारांकडून ९०.८९९ कोटी रुपयांच्या देणगीरुपी मिळाले. भाजपला "२०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी इतर सर्व राष्ट्रीय पक्षांनी जाहीर केलेल्या एकूण कॉर्पोरेट देणग्यांच्या नऊ पट जास्त मिळाल्या आहेत.

राजकीय पक्षांना देणगी देणारे टॉप १० देणगीदार

१) प्रुडंट इलेक्टोरल ट्रस्ट: भाजप आणि काँग्रेसला एकत्रितपणे ८८० कोटी रुपयांची देणगी दिली आणि सर्वाधिक देणग्या मिळालेल्या पक्षांना हा सर्वोच्च देणगीदार आहे. या ट्रस्टने भाजपला ७२३.६ कोटी रुपये (पक्षाला मिळालेल्या एकूण निधीच्या ३२.२५%) आणि काँग्रेसला १५६.४ कोटी रुपये (पक्षाला मिळालेल्या एकूण निधीच्या ५५.५६%) दिले.

२) ट्रायम्फ इलेक्टोरल ट्रस्टकडून भाजपला १२७.५० कोटी रुपयांची देणगी.

३) डेरिव्ह इन्व्हेस्टमेंट्सने भाजपला ५० कोटी तर काँग्रेसला ३.२ कोटी रुपयांची देणगी.

४) अ‍ॅक्मी सोलर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड : (५१ कोटी)

५) रुंगटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड : (५० कोटी)

६) भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड : ( ५० कोटी)

७) आयटीसी इन्फोटेक इंडिया लिमिटेड : ( ८० कोटी)

८) दिनेश चंद्र आर. अग्रवाल इन्फ्रॅकॉन प्रायव्हेट लिमिटेडकडून भाजपला ३० कोटी

९) दिलीप बिल्डकॉन लिमिटेड : ( २९ कोटी)

१०) मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेड : (२७ कोटी)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news