

पुढारी ऑनलाईन : "राजकारण हा माझा पूर्णवेळ व्यवसाय नाही. उत्तर प्रदेशातील जनतेची सेवा करण्यासाठी मी मुख्यमंत्री पदा कार्यरत आहे. मी मनापासून योगी आहे. मी कायमचे राजकारणात आलो नाही. माझ्या पक्ष भाजपने मला दिलेली जबाबदारी मी पार पाडत आहे," अशा शब्दांमध्ये पंतप्रधानपदाबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
वृत्तसंस्था 'पीटीआय'ला दिलेल्या मुलाखतीत योगी आदित्यनाथ म्हणाले की, मी राजकारणात किती काळ राहीन याची एक कालमर्यादा आहे. मी कायमचा राजकारणात नाही. उत्तर प्रदेशातील जनतेची सेवा करण्यासाठी मी मुख्यमंत्री पदावर आहे. मी मनापासून योगी आहे. मी कायमचे राजकारणात आलो नाही. माझ्या पक्ष भाजपने मला दिलेली जबाबदारी मी पार पाडत आहे.
धर्माची राजकारणाशी सांगड घालणे चुकीचे आहे. आपण राजकारणाची जबाबदारी काही लोकांवर सोड, तो ही आपली चूक आहे. यामुळे समस्या निर्माण होतात. राजकारणाचे उद्दिष्ट स्वार्थ पूर्ण करणे नाही तर समाजाचे भले करणे आहे. धर्माचे ध्येय देखील दान आहे. जेव्हा धर्माचा वापर स्वार्थी हेतूंसाठी केला जातो तेव्हा समस्या उद्भवतात; पण जेव्हा उद्देश परोपकारी असतो तेव्हा धर्म प्रगतीचा मार्ग मोकळा करतो, असेही योगी आदित्यनाथ यांनी यावेळी नमूद केले.
३० मार्च रोजी पंतप्रधान मोदींच्या संघ मुख्यालयाच्या भेटीनंतर त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांबाबत सध्या चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून पाहिले जात आहे. देशाचा पुढचा पंतप्रधान महाराष्ट्राचा असेल, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. फक्त नरेंद्र मोदी हेच देशाचे नेतृत्व करतील. आपल्या संस्कृतीत वडील जिवंत असताना उत्तराधिकारीची चर्चा होत नाही, असे प्रत्युत्तर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना दिले आहे.