Sonam Wangchuk Arrest : सोनम वांगचुक यांना अटक; गृह मंत्रालयाची मोठी कारवाई

लडाखमधील पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर जमावाला उकसवणारी वक्तव्य केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
Sonam Wangchuk Arrest
Sonam Wangchuk ArrestCanva Pudhari Image
Published on
Updated on

Sonam Wangchuk arrest :

लडाखमधील पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर जमावाला उकसवणारी वक्तव्य केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. सोनम वांगचुक यांनी काही दिवसांपूर्वीच मी या प्रकरणी आनंदानं स्वतःला अटक करून घेण्यास तयार आहे असं वक्तव्य केलं होतं.

Sonam Wangchuk Arrest
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांच्या संस्थेचा परवाना रद्द; लेह हिंसाचारावर सरकारने कठोर कारवाई केली

केंद्रीय गृह मंत्रालयानं काल वांगचुक यांच्या एनजीओचे सर्व परवाने रद्द केले होते. त्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या स्टुडंट एज्युकेशन अँड कल्चरल मुव्हमेंट ऑफ लडाख या संस्थेला विदेशातून फंडिंग मिळतं. त्याच्यावर फॉरेन फंडिग अॅक्ट २०१० अंतर्गत करावाई करण्यात आली आहे.

डोंगराळ प्रदेशात कार्यरत असलेल्या वांगचुक यांना २०१८ मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला आहे, वांगचुक यांनी केंद्रीय गृह मंत्रालय आणि लडाख केंद्र शासित प्रदेश प्रशासनानं केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

Sonam Wangchuk Arrest
MiG - 21 Bison Retire : 1965 च्या युद्धापासून बालाकोट एअर स्ट्राईकपर्यंत दमदार कामगिरी करणाऱ्या MiG - 21 चं निवृत्तीनंतर काय होणार?

लेह सिटीमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला, तर सुरक्षा कर्मचाऱ्यांसह ५० हून अधिक लोक जखमी झाले होते. याचं खापर प्रशासनानं उपोषण करणाऱ्या वांगचुक यांच्यावर फोडलं होतं.

दरम्यान, वांगचुक यांनी आपल्या एनजीओसाठी परदेशातून कोणतीही देणगी घेतलेली नाही. मात्र त्यांनी संयुक्त राष्ट्र संघस स्विस आणि इटालियन संस्थेसोबत व्यवहार केल्याचं सांगितलं. त्यांनी आपण सर्व कर भल्याचं देखील सांगितलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news