'युपी'त BSP नेत्‍याच्‍या हत्या प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार

अंबाला येथे 'एसटीएफ'ची धडक कारवाई, तीन पाेलीस कर्मचारी जखमी
Encounter ​​Near Ambala
प्रातिनिधिक छायाचित्र. File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बहुजन समाज पार्टीचे नेते हरबिलास सिंह रज्जुमजरा यांच्‍या हत्‍या प्रकरणातील आरोपी सागर चकमकीत ठार झाला. अंबाला पोलिस आणि विशेष कृती दलाच्‍या (एसटीएफ) संयुक्‍त कारवाईत तीन पोलिस जखमी झाले आहेत. (Encounter ​​Near Ambala )

बसपा नेता हरबिलास यांची २४ जानेवारी राेजी झाली हाेती हत्‍या 

बसपाचे राज्‍य सचिव आणि हरबिलास रज्जुमजरा यांची २४ जानेवारी रोजी अंबाला येथील नारायणगड येथे पाच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हरबिलास त्यांच्या मित्रांसह पार्कजवळील इनोव्हा कारमध्ये बसले असताना कारमधून आलेल्‍या गुंडांनी हरबिलाश यांच्‍या कारवर अंदाधूंद गोळीबार केला होता. हरबिलाश आणि त्यांच्‍या साथीदारांनी कारमधून उतरुन पलायनाचा प्रयत्‍न केला;पण हल्लेखोरांनी पाठलाग करुन त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्‍या. छातीत पाच गोळ्या लागल्या हरबिलास यांचा जागीच मृत्‍यू झला होता. त्यांच्या साथीदार चुन्नू डांग आणि गुग्गल पंडित हे जखमी झाले होते.

सहा दिवसांत गुंड सागरचा खात्‍मा 

आज अंबाला येथे सागरला जेरबंद करण्‍यासाठी अंबाला पोलिस आणि विशेष कृती दलाच्‍या (एसटीएफ) संयुक्‍त कारवाई केली. यावेळी त्‍याने पोलिसांवर गोळीबार केला. यावेळी तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. पोलिसांनी प्रत्युत्तरात केलेल्‍या गोळीबारात सागर जागीच ठार झाला. त्‍याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाला कॅन्ट सिव्हिल हॉस्पिटलच्या शवागारात हलविण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news