

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्या ताफ्यातील एका वाहनाला आज (दि.२२) अपघात झाला. या दुर्घटनेत सात पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वसुंधराराजे रविवारी दुपारी राजस्थानचे मंत्री ओटा राम देवासी यांच्या मुंदरा गावी जात हाेत्या. पाली येथे त्यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात झाला. समोरून आलेली मोटारसायकल चुकवताना ही वाहन पलटी झाले. यामध्ये सात पाेलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सूरु आहेत.