'AAP'चा काँग्रेसला २४ तासांचा अल्टिमेटम!'...तर INDIA आघाडीतून बाहेरचा रस्ता'

Delhi election | आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात कटुता वाढली
Delhi election, Congress, AAP
आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात कटुता वाढली आहे. (Image source- PTI)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी (Delhi election) विरोधी इंडिया आघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण आम आदमी पक्ष (AAP) आणि काँग्रेस यांच्यात कटुता वाढली आहे. आपने म्हटले आहे की, काँग्रेसला इंडिया (INDIA) आघाडीतून बाहेर करण्यासाठी आम्ही इतर पक्षांशी सल्लामसलत करू. काँग्रेसने अरविंद केजरीवाल यांच्यावर अस्तित्वात नसलेल्या कल्याणकारी योजनांची आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल आणि फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी काँग्रेसने तक्रार दाखल केली आहे. यामुळे 'आप'ने काँग्रेसवर नाराज व्यक्त केली आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजय माकन यांनी आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे अँटी नॅशनल म्हणजेच देशविरोधी असल्याचे म्हटले आहे. यासोबतच अजय माकन यांनी, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षासोबत युती करणे ही काँग्रेसची मोठी चूक होती. ही चूक आता सुधारण्याची गरज असल्याचे वक्तव्य केले आहे. यावर आपने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आपने काँग्रेसला माकन यांच्यावर कारवाई करण्यासाठी २४ तासांचा अल्टिमेटम दिला आहे.

या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेत बोलताना आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी केजरीवाल यांना 'देशविरोधी' संबोधल्याबद्दल माकन यांच्यावर जोरदार टीका केली. काँग्रेसने त्यांच्यावर २४ तासांच्या आत त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा आम आदमी पक्ष काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर करण्यासाठी अन्य पक्षांशी सल्लामसलत करेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. या पत्रकार परिषदेवेळी दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी उपस्थित होत्या.

दिल्लीत काँग्रेसची 'भाजप'ला मदत, 'AAP'चा आरोप

"दिल्लीमध्ये काँग्रेस भाजपच्या पाठीशी उभी राहिली आहे. ते विधानसभा निवडणुकीत भाजपला फायदा मिळवून देण्याच्या उद्देशाने सर्व काही करत आहे. अजय माकन भाजपची स्क्रिप्ट वाचून दाखवत आहेत. ते त्यांच्या आग्रहावरूनच 'आप'च्या विरोधात वक्तव्ये करत आहेत. त्यांनी अरविंद केजरीवाल यांचा देशविरोधी असा उल्लेख करून मर्यादा ओलांडली आहे. माकन यांनी कधीही भाजपच्या कोणत्याही नेत्याला देशद्रोही म्हटले आहे का?, असा सवाल संजय सिंह यांनी केला.

'अजय माकन यांच्यावर २४ तासांत कारवाई करावी अन्यथा...'

"आम्ही हरियाणातील निवडणुकीत काँग्रेसशी युती करण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न निष्फळ ठरला. संपूर्ण प्रचारादरम्यान आम्ही काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याबद्दल एकही चुकीचा शब्द वापरला नाही. आता काँग्रेसची यादी पाहून असे दिसते की ती भाजपच्या मुख्यालयात करण्यात आली आहे. आमचे काँग्रेसला आवाहन आहे की, अजय माकन यांच्यावर २४ तासांत कारवाई करावी अन्यथा आम्ही इंडिया आघाडीतील इतर पक्षांना काँग्रेसला बाहेर करण्यासाठी सांगू.'' असा इशारा त्यांनी दिला आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात काँग्रेसचे संदीप दीक्षित

दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी संजय सिंह यांच्यासोबत घेतलेल्या या पत्रकार परिषदेत काँग्रेसवर गंभीर आरोप केले. भाजप संदीप दीक्षित यांच्यासह काँग्रेसच्या उमेदवारांना निधी पुरवत असल्याची माहिती 'आप'ला मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने संदीप दीक्षित यांना अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात रिंगणात उभे केले आहे.

Delhi election, Congress, AAP
महिला सन्मान योजना: भाजप महिला मोर्चाची अरविंद केजरीवाल यांच्या घरासमोर निदर्शने

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news