Ayodhya Deepotsav 2026 : अयोध्येत दीपोत्सवाचा नवा विक्रम! ५६ घाटांवर उजळणार ३० लाख दिवे; २१०० ड्रोनद्वारे रामायणाचा भव्य शो

पराष्ट्रपतींसह मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राहणार उपस्थित; जाणून घ्या दीपोत्सवाचे संपूर्ण वेळापत्रक
Ayodhya Deepotsav 2026
Ayodhya Deepotsav 2026 : अयोध्येत दीपोत्सवाचा नवा विक्रम! ५६ घाटांवर उजळणार ३० लाख दिवे; २१०० ड्रोनद्वारे रामायणाचा भव्य शोfile photo
Published on: 
Updated on: 

A new record of Deepotsav in Ayodhya! 30 lakh lights will be lit on 56 ghats; A grand show of Ramayana by 2100 drones

पुढारी ऑनलाईन : छोटी दिवाळी अर्थात नरक चतुर्दशीच्या निमित्ताने आज अयोध्येत १० वा दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यानिमित्ताने सरयू नदीच्या ५६ घाटांवर ३० लाखांहून अधिक दिवे प्रज्वलित केले जाणार आहेत. यावेळी २१०० बटुकांकडून महाआरती केली जाणार असून, २१०० ड्रोनच्या माध्यमातून आकाशात रामायणातील विविध प्रसंग साकारले जाणार आहेत.

Ayodhya Deepotsav 2026
रोहित शेट्टींच्या घराबाहेर गोळीबार, मग बॉलिवूडला धमक्या... आता अमेरिकेत हॅरी बॉक्सरला घेतले ताब्यात

आज छोटी दिवाळी आहे. या पार्श्वभूमीवर दीपोत्सवासाठी अयोध्याधा सज्ज झाले आहे. सरयू नदीच्या सर्व ५६ घाटांवर दिव्यांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. संपूर्ण अयोध्यानगरी रोषणाईने उजळून निघाली आहे. येथे 3D स्क्रीनवर रामायणातील प्रमुख प्रसंग जिवंत करण्यात आले आहेत.

आजच्या दीपोत्सव सोहळ्यात सहभागी होण्यासाठी देशाचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन अयोध्येत दाखल होणार आहेत. तसेच उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही उपस्थिती असणार आहे.

अयोध्येत दीपोत्सवाचा नवा विक्रम होणार

रामनगरी अयोध्येत यंदाच्या दीपोत्सवात नवा विक्रम प्रस्थापित होणार आहे. राम की पैडी येथील ५६ घाटांवर ३० लाखांहून अधिक दिवे प्रज्वलित केले जाणार आहेत. सरयू नदीच्या तीरावर २१०० बटुक महाआरती करणार आहेत. याशिवाय २१०० ड्रोनच्या मदतीने रामायणावर आधारित विशेष शो सादर केला जाणार आहे. आकर्षक रोषणाई आणि रामायणातील विविध प्रसंगांनी सजलेली प्रभू श्रीरामांची नगरी अयोध्या १० व्या दीपोत्सवाच्या भव्य आयोजनासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे.

Ayodhya Deepotsav 2026
Diwali 2026 : ८ की ९ नोव्हेंबर, कधी आहे दिवाळी? एका क्लिकमध्ये दूर करा संभ्रम; जाणून घ्या शुभ मुहूर्त

अयोध्येतील दीपोत्सवाचे संपूर्ण वेळापत्रक

- सकाळी १० वाजता : साकेत डिग्री कॉलेजमधून शोभायात्रेला सुरुवात होईल.

- दुपारी २ वाजेपर्यंत : शोभायात्रा रामकथा पार्क येथे पोहोचेल.

- दुपारी २:१५ वाजता : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्या विमानतळावर पोहोचतील.

- दुपारी २:३० वाजता : उपराष्ट्रपती अयोध्येत दाखल होतील.

- त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपराष्ट्रपती राम मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत.

- दुपारी ३:२५ ते ३:४० : भगवान श्रीराम आणि माता सीतेच्या वेशातील कलाकार हेलिकॉप्टरमधून रामकथा पार्क येथे पोहोचतील. यावेळी भरत मिलाप सोहळा होईल.

- दुपारी ३:५० ते ४:१० : रामकथा पार्कमध्ये राम-जानकी यांचे पूजन, वंदन, आरती आणि श्रीरामांचा प्रतीकात्मक राज्याभिषेक होईल.

- सायंकाळी ४:२५ ते ४:४० : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे भाषण होईल.

- सायंकाळी ५:३५ ते ५:५५ : नया घाट येथे सरयू नदीची आरती होईल.

- सायंकाळी ६:०० ते ६:२५ : राम की पैडी येथे दीपप्रज्वलन होईल.

- सायंकाळी ६:२५ ते ६:५५ : 3D प्रोजेक्शन मॅपिंग, रामायणावर आधारित लेझर शो आणि ड्रोन शो आयोजित केला जाईल.

- सायंकाळी ६:५५ ते ७:०५ : राम की पैडी येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे भाषण होईल.

- सायंकाळी ७:४० ते ७:५० : फटाक्यांची आतषबाजी होईल.

सुरक्षेच्या दृष्टीने अयोध्येची २० झोनमध्ये विभागणी

दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत सुरक्षेची कडक व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण अयोध्येची २० झोन आणि ५३ सेक्टरमध्ये विभागणी करण्यात आली आहे. तसेच पोलीस, सीआरपीएफ, पीएसी, बॉम्ब शोधक पथक आणि अग्निशमन विभागाच्या पथकांनाही सतर्क ठेवण्यात आले आहे. त्यामुळे दीपोत्सवाचा सोहळा सुरक्षित वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.