Hathras stampede | उत्तर प्रदेशात हाथरसमध्‍ये चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ८७

धार्मिक कार्यक्रमानंतर दुर्घटना, मृतांमध्‍ये महिला आणि लहान मुलांचा समावेश
Hathras stampede
हाथरस येथे चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ८७ वर पोहोचली आहे.PUDHARI

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे आज ( दि. २) एका धार्मिक कार्यक्रमात झालेल्‍या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ८७ वर पोहोचली आहे. ANI या वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे. मृतांमध्‍ये बहुतांश महिला, मुले यांचा समावशे आहे. या घटनेतील जमखींची संख्या १८ इतकी आहे. दरम्‍यान, या घटनेची गंभीर दखल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदिनाथ यांनी घेतली आहे. त्‍यांनी मदतकार्य जलद करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत

हाथरस येथील रतीभानपूर येथे भोले बाबांच्या सत्संग कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सांगता होताच चेंगराचेंगरी झाली.या दुर्घटनेत आतापर्यंत ८७ जणांचा मृत्‍यू झाल्‍याची माहिती, जिल्हा दंडाधिकारी आशिष कुमार यांनी ANIशी बोलताना दिली आहे. १५ महिलांसह काही मुलांवर उपचार सुरु आहेत.

भोले बाबांच्या सत्संग कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. कार्यक्रम संपल्‍यानंतर मंडपातून बाहेर पडताना एकच गर्दी उसळली. चेंगराचेंगरी झाली. महिला आणि मुले गर्दीत चेंगरली गेली. वाचवायला कोणीच नव्हते. सर्वत्र आरडाओरडा, आरडाओरडा सुरू होता. सर्वांना उपचारासाठी एटा मेडिकल कॉलेजमध्ये आणण्यात आले. उपचारापूर्वीच अनेकांचा मृत्‍यू झाल्‍याचे डॉक्‍टरांनी जाहीर केले.

मुख्यमंत्री योगींनी व्‍यक्‍त केला शोक

हाथरस दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या X वर पोस्‍ट केली आहे की, "हाथरस जिल्ह्यातील दुर्दैवी अपघातात प्राणहानी अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. शोकाकुल कुटुंबासोबत माझ्या संवेदना आहेत. मदत व बचाव कार्य युद्धपातळीवर राबवून जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. अपघाताच्या कारणांचा शोध घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत."

चौकशीचे आदेश

आशिष कुमार म्हणाले, "जिल्हा प्रशासन या प्रकरणाची चौकशी करत आहेत. उपविभागीय कार्यालयाने या कार्यक्रमाला परवानगी दिली होती, आणि हा खासगी कार्यक्रम होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. जखमी, तसेच मृतांच्या नातेवाईकांना मदत देण्यात येईल."

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news