Brigadier L S Liddar : ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर यांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप | पुढारी

Brigadier L S Liddar : ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर यांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : Brigadier L S Liddar : देशाचे चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. या अपघातात १३ जणांना आपले प्राण गमवावे लागले. दरम्यान, रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासह केवळ चौघांची ओळख पटली असून, सर्वांचे पार्थिव सुपर हर्क्युलस विमानाने नवी दिल्लीच्या पालम विमानतळावर रात्री आणण्यात आले.

जनलर बिपीन रावत यांच्यावर लष्करी इतमामात आज (दि.१०) सायंकाळी ४ वाजता अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत.

तर ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी अत्यंसंस्कार करण्यात आले. त्यांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.

Brigadier L S Liddar : डिफेन्स स्टाफमध्ये सुरक्षा सल्लागार म्हणून कार्यरत…

ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर हे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफमध्ये सुरक्षा सल्लागार म्हणून कार्यरत होते. ते जनरल रावत यांचे संरक्षण सहाय्यक होते. नॅशनल डिफेन्स अकादमीतून प्रशिक्षण घेतलेल्या लिड्डर यांनी पूर्व काश्मीरमधील लष्कराच्या विविध मोहिमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

मिलिटरी ऑपरेशन डायरेक्टोरेटमध्येही ते कार्यरत होते. त्यांच्या सेवेबद्दल सेना पदक आणि विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले.

एल. एस. लिद्दर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंह, विंग कमांडर पी. एस. चौहान, स्क्‍वॉड्रन लीडर के. सिंह, नायक गुरसेवक सिंह, नायक जितेंद्र कुमार, लान्स नायक विवेक कुमार, लान्स नायक बी. साई तेजा, ज्युनिअर वॉरंट ऑफिसर दास, ज्युनिअर वॉरंट ऑफिसर ए. प्रदीप आणि हवालदार सतपाल अशी अन्य मृतांची नावे आहेत. इतर मृतांची अद्यापही ओळख पटलेली नाही.

नवी दिल्ली येथील लष्कराच्या पालम एअरबेसवर सीडीएस बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि अन्य ११ जणांचे पार्थिव आणण्यात आले.

या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल पार्थिवाला मानवंदना देतील. बुधवारी हेलिकॉप्टर दुर्घटनेत झालेल्या अकाली मृत्यूने देश स्तब्ध झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह तमाम नेत्यांनी रावत यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Back to top button