NEET Row : जळालेली प्रश्नपत्रिका घेऊन तपास पथक दिल्लीला रवाना

तपासाची माहिती एनटीएसह शिक्षण मंत्रालयास सादर
NEET Row
प्रातिनिधिक छायाचित्रFile Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेली नीट-यूजी परीक्षेतील गैरप्रकाराविरोधात देशभरातील रोष पाहायला मिळत आहे.या प्रकरणचा मास्‍टरमाइंडचा शोध सध्‍या बिहार पोलीस घेत आहेत. बिहारमधील कॉन्स्टेबल भरती, शिक्षक भरती आणि NEET पेपर लीक प्रकरण एकमेकांशी संबंधित असल्याचा बिहार पोलिसांचा दावा आहे. जळालेली प्रश्नपत्रिका आणि पुस्तिका क्रमांक घेऊन बिहार पोलीसाचे तपास पथक दिल्‍लीला रवाना झाले आहे. दरम्‍यान, तपास यंत्रणेने एनटीए आणि शिक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना आतापर्यंत केलेल्या कारवाईबाबत संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे.

पोलिसांनी जप्‍त केली जळालेली प्रश्नपत्रिका

पोलिसांनी जळालेली प्रश्नपत्रिका आणि पुस्तिका क्रमांक ६१३६४८८ जप्त केली आहे. ही पुस्तिका हजारीबाग येथील एका केंद्राची असल्याचा दावा केला जात आहे. आतापर्यंतच्या तपासात नूरसराय महाविद्यालयातील कर्मचारी संजीव मुखिया हा पेपर लीक करणाऱ्या टोळीचा म्होरक्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.

NEET Row
नीट परीक्षेचा पेपर अवघडच! प्रश्न फिरवून विचारल्यामुळे विद्यार्थी गोंधळात

प्राध्यापकाने संजीव यांना व्हॉट्स ॲपवर पाठवली प्रश्नपत्रिका

पोलिसांनी संजीव मुखियाचा शोधही तीव्र केला आहे. एका प्राध्यापकाने संजीव यांना व्हॉट्स ॲपवर प्रश्नपत्रिका पाठवल्याचा आरोप आहे. पाटणा आणि रांची येथील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या मदती घेण्‍यात आल्‍याचेही तपासात स्‍पष्‍ट झाले आहे. नीटची परीक्षा असणारा दिवशी म्‍हणजे ५ मे रोजी सकाळी करईपुरसुराई येथील चिंटू उर्फ ​​बलदेव याच्या मोबाईलवर उत्तरासह पाठवले हेते. यानंतर, सुमारे 20-25 उमेदवार, ज्यांना पाटणा येथील एका प्ले स्कूलमध्ये नियुक्त करण्यात आले होते, त्यांना हे प्रश्नोत्तरे लक्षात ठेवण्यासाठी पाठवण्यात आल्‍याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

NEET Row
NEET 2024 : दूरस्थ शिक्षण घेणाऱ्यांनाही ‘नीट’ची परीक्षा देता येणार; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

अटकेच्या भीतीने संजीव मुखिया फरार

तपास यंत्रणेने नालंदा पोलिसांना नोटीस पाठवून संजीव मुखियाला अटक करण्यास सांगितले आहे. नालंदा पोलिसांनी संजीव मुखियाच्या घरावर छापा टाकला मात्र तो फरार झाला. संजीव व्यतिरिक्त याप्रकरणातील आरोपी राकेश रंजन, चिंटू, पिंटू, आशुतोष यांच्यासह अनेकांचा पोलीस शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news