पुण्याच्या प्रश्नांसंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री मोहोळांनी घेतली गृहमंत्री अमित शहा यांची भेट

पुण्याच्या प्रश्नांसंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री मोहोळांची गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा
पुण्याच्या प्रश्नांसंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री मोहोळांची गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मुरलीधर मोहोळ यांनी सहकार आणि विमान वाहतूक खात्याचे राज्यमंत्री म्हणून कारभार स्वीकारल्यानंतर तातडीने कामाला सुरुवात केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मोहोळ यांची शुक्रवारी (दि.14) दिल्ली येथे बैठक झाली. या बैठकीत पुण्यामधील विविध विकासकामांच्या बाबत सविस्तर चर्चा झाली.' तसेच सर्व प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन अमित शाह यांनी दिल्याचे मोहोळ यांनी सांगितले.

या बैठकीबाबत अधिक माहिती देताना मोहोळ म्हणाले की , 'पुणे विमानतळावरील नव्या टर्मिनलचे काम लवकरच सुरू करण्यासंदर्भात चर्चा झाली. यासोबतच गृहमंत्रालयाच्या अधिकाराखाली असलेल्या सीआयएसएफच्या मनुष्यबळाची पूर्तता करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय झाला आहे. यामुळे नवे टर्मिनल सुरू करण्याला गती प्राप्त झाली आहे. हे टर्मिनल लवकर सुरू करून प्रवाशांना दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न आहे.'

अमित शाह यांच्या गृहमंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापानातून मिळाणाऱ्या निधीतून शहरभर विविध कामे केली जाणार आहेत. पुणे शहरातील पूर परिस्थिती नियंत्रणासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाकडून येणारा निधी काही काळ प्रलंबित आहे. शहरातील पावसाच्या पाण्याचा निचऱ्याचे नियोजन आणि पूर नियंत्रणासाठी हा निधी तत्काळ मिळावा, असाही मुद्दा बैठकीत मांडण्यात आला. या निर्णयावर अमित शाह यांनी सकारात्मकता दर्शवली आणि तातडीने निधी दिला जाईल, असे सांगितले,' असेही मोहोळ म्हणाले.

'रनवे'वर अडकलेल्या 'त्या' विमानाचा प्रश्न मार्गी लावणार

पुणे विमानतळाच्या 'रनवे'वर एअर इंडियाचे अपघातग्रस्त विमान उभे आहे. त्याने व्यापलेल्या जागेचा ताण इतर विमानांच्या प्रवासी वाहतुकीवर झाला आहे. हा रनवे वापरात नसल्यामुळे इतर विमानांचे वेळापत्रक कोलमडत आहे. हे विमान दुरुस्तीसाठी आणखी काही काळ लागण्याची शक्यता असून, विमान काही काळ संरक्षण दलाच्या जागेवर हलविण्याचा पर्याय उपलब्ध आहे. हे अपघातग्रस्त विमान संरक्षण दलाच्या जागेत लावण्याबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा झाली आहे,' अशी माहिती मोहोळ यांनी दिली.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news