

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा राजधानी दिल्लीतील लाजपत नगरमध्ये लहान मुलांच्या रूग्णालयाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. परिसरातील Eye7 रूग्णालयाला आग लागली. ही भीषण आग विझवण्यासाठी दिल्ली अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. आगीच्या घटनेची माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन दलाच्या जवळपास १६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. ही आग इतकी भयंकर होती की, रूग्णालयाच्या इमारतीमधून आगीसोबत धुराचे लोटही बाहेर पडत असल्याचे दिसून येत होते.
नुकतीच आगीची घटना घडली होती.
काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना दिल्लीमध्ये घडली होती. ज्यामध्ये एका लहान मुलांच्या रूग्णालयाला र्भीषण आग लागली होती. ज्यामध्ये जवळपास सात नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता. अधिकार्यांच्या माहितीनुसार, आग लागलेल्या रूग्णालयातून जवळपास १२ नवजात बालकांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले होते. या घटनेनंतर ही गोष्ट समोर आली की, हे रूग्णालय काही वर्षापूर्वीही वादात आले होते.
हेही वाचा :