प्रातिनिधिक छायाचित्र. File photo
राष्ट्रीय
'गंगा स्नाना'ची मनोकामना राहिली अधुरी..! 'महाकुंभ'ला जाताना भीषण अपघातात ८ ठार
राजस्थानमधील भाविकांवर काळाचा घाला, टायर फुटल्याने कारची बसला धडक
पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रयागराजमधील कुंभमेळ्याला जाणार्या भाविकांवर आज (दि.६) काळाने घाला घातला. जयपूरमधील मोखमपुराजवळ राष्ट्रीय महामार्ग ४८ वर झालेल्या भीषण अपघतात आठ भाविक जागीच ठार झाल्याचे वृत्त 'इंडिया टूडे'ने दिले आहे.
कारमधील भाविक प्रयागराजमधील कुंभमेळ्यासाठी जात होते. मोखमपुराजवळ राष्ट्रीय महामार्ग ४८ वर कारचे टायर फुटले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावरून कोसळून एका बसला धडकली. ही धडक एवढी भीषण हाेती की, कारमधील सर्व आठ भाविक जागीच ठार झाले.

