नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : हवामान खात्याने मे महिन्यात पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार, झारखंड, गुजरातमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. त्यासोबतच महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. देशात उन्हाचा पारा सातत्याने वाढतच आहे. त्यामध्ये आता हवामान खात्याने उष्णतेचा रेड अलर्ट जारी केला. Heat Wave Alert
हवामान खात्याच्या माहितीनुसार महाराष्ट्र, ओडिशा, झारखंड, तेलंगणा, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये या दोन दिवसांत तापमान ४३ अंशापेक्षा जास्त असू शकते. तर गुजरात सोडून या सर्व राज्यांमध्ये संपूर्ण मे महिन्यात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव दिसून येईल. मात्र, मध्य प्रदेशात उष्णतेच्या लाटेपासून बऱ्याच अंशी दिलासा मिळणार आहे. Heat Wave Alert
तर उत्तर भारतातील राज्यांत वादळाची परिस्थिती निर्माण होत आहे. यामुळे, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीमध्ये उष्णतेची लाट राहण्याची शक्यता कमी आहे.
Heat Wave Alert : उष्णतेची लाट कधी येते?
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मैदानी भागात तापमान ४० अंश, समुद्र किनाऱ्याजवळील भागात ३७ अंश आणि डोंगराळ भागात ३० अंशांवर पोहोचल्यावर उष्णतेची लाट येते. जेव्हा तापमान सामान्यपेक्षा ४.५ अंश सेल्सिअसने वाढते तेव्हा उष्णतेची लाट येते आणि जेव्हा तापमान ६.४ अंशांनी वाढते, तेव्हा तीव्र उष्णतेची लाट येते.
हेही वाचा