तिरुमला देवस्थानची एफडी यंदा 1161 कोटींची!; गत 12 वर्षांतील उच्चांक | पुढारी

तिरुमला देवस्थानची एफडी यंदा 1161 कोटींची!; गत 12 वर्षांतील उच्चांक

तिरुमला : वृत्तसंस्था :  जगातील सर्वांत श्रीमंत मंदिर असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानने यंदा एक हजार 161 कोटी रुपयांची एफडी केली आहे. गेल्या 12 वर्षांतील हा उच्चांक असून गेल्या 12 वर्षांपासून सातत्याने 500 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक रुपये एफडी म्हणून जमा करणारे हे पहिले हिंदू देवस्थान ठरले आहे. बँकांमधील ट्रस्टची एकूण एफडी 13,287 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
व्याजच 1,600 कोटी!

विविध बँकांतील मुदतठेवी आणि ट्रस्टमधील रोकड मिळून मंदिराचा बॅलन्स 18 हजार 817 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आजवरच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी रक्कम आहे. ट्रस्टला एफडीवर दरवर्षी जवळपास 1,600 कोटी रुपये व्याज मिळते.

सोने 11,329 किलो!

मंदिरात एक हजार 31 किलो सोने नुकतेच जमा झाले आहे. यानंतर मंदिराचा बँकांमधील सोन्याचा साठाही 11 हजार 329 किलो झाला आहे.

2012 मध्ये ट्रस्टची एफडी

4820 कोटी रु.
2013 मध्ये 608 कोटी रु.
2014 मध्ये 970 कोटी
2015 मध्ये 961 कोटी
2016 मध्ये 1153 कोटी
2017 मध्ये 774 कोटी
2018 मध्ये 501 कोटी
2019 मध्ये 285 कोटी
2020 मध्ये 753 कोटी
2021 मध्ये 270 कोटी
2022 मध्ये 274 कोटी
2023 मध्ये 757 कोटी
2013 ते 2024 ट्रस्टमध्ये
8467 कोटी रुपये जमा झाले.

Back to top button