India Omicron Corona : देशात ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही, केंद्र सरकारची संसदेत माहिती

India Omicron Corona : देशात ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही, केंद्र सरकारची संसदेत माहिती

Published on

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : India Omicron Corona :  दक्षिण अफ्रिकेतून आलेल्या कोरोनाच्या ओमायक्रॉन या व्हेरियंटचा सध्यातरी एकही रुग्ण सापडला नसल्याचे मंगळवारी संसदेत केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात आले. मात्र, सर्व त्या पातळ्यांवर सतर्कता पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्याच्या आणि योग्य त्या आरोग्य सेवा पुरवण्याच्या सूचना सर्व राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आल्या आहेत. परदेशातून आलेल्या प्रवाशांची कोरोना चाचणी घेण्यासह सांगितले आहे.

दरम्यान, मुंबईतही ओमायक्रॉनचा रुग्ण सापडलेला नाही. महापालिकेच्या पातळीवर सर्व ती खबरदारी घेण्यात आल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी मंगळवारी सांगितले.

दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आणि अन्य शहरांत आलेल्या 100 प्रवाशांची मुंबई विमानतळावर तपासणी केली असून त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आले आहे.

India Omicron Corona : मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सूचनांनुसार मुंबई विमानतळावर प्रवाशांची तपासणी

मात्र, सध्यातरी मुंबईत ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नसल्याचे पेडणेकर यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनांनुसार मुंबई विमानतळावर प्रवाशांची तपासणी केली जात आहे. संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले.

कोरोना महामारीतून सावरत असताना नव्याने समोर आलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटने चिंता वाढवली आहे.

अशात भारताकडून 31 देशांदरम्यान प्रवासी विमान वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. त्याच्या मार्गदर्शक सूचनाही तयार केल्या आहेत.

विदेशात प्रवास करण्यासाठी प्रवाशांना आपले लस प्रमाणपत्र पासपोर्टसोबत संलग्न करणे गरजेचे आहे.

…असे लिंक करा लस प्रमाणपत्र

प्रवाशांना 'कोव्हॅक्सिन'च्या अधिकृत संकेतस्थळावर अथवा अ‍ॅपवर जाऊन आपले लस प्रमाणपत्र पासपोर्टशी संलग्न करता येईल.

लॉगिन करण्यासाठी आपला मोबाईक क्रमांक समाविष्ट केल्यानंतर त्यावर एक ओटीपी येईल. त्याद्वारे लॉगिन करता येईल.

ओपन होणार्‍या विंडोत पासपोर्ट क्रमांक, नाव आदी आवश्यक माहिती भरून सबमिट रिक्वेस्टवर क्लिक करा. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक मेसेज येईल.

त्याद्वारे तुम्हाला पोसपोर्टसोबत लिंक झालेले लस प्रमाणपत्र डाऊनलोड करता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news