तब्‍बल १९ दिवस 'डिजिटल अरेस्‍ट'..! निवृत्त इंजिनिअरने गमावली आयुष्‍यभराची बचत

Digital Arrest : 'मनी लाँड्रिग'प्रकरणाच्‍या चौकशीची बतावणी करत तब्‍बल १० कोटींवर डल्‍ला
 'Digital Arrest'
प्रातिनिधिक छायाचित्र.File Photo
Published on: 
Updated on: 

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मागील काही दिवस डिजिटल अरेस्‍ट या नावाखाली नागरिकांच्‍या फसवणुकीचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. या सायबर गुन्‍ह्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गंभीर दखल घेतली आहे. त्‍यांनी काही दिवसांपूर्वीच 'मन की बात' कार्यक्रमातून डिजिटल अरेस्‍टवर उपाय म्‍हणून सर्व नागरिकांनी ‘थांबा, विचार करा आणि मग कृती करा’ या सूत्राचा वापर करण्‍याचा सल्लाही दिला होता. मात्र तरीही डिजिटल अरेस्‍टच्‍या माध्‍यमातून फसवणुकीचे प्रकार वाढतच आहेत. केंद्र सरकारही या समस्‍येवर उपाय म्‍हणून व्‍यापक प्रबोधनही करत आहे. अशातच 'डिजिटल अरेस्‍ट'मध्‍ये नवी दिल्‍लीतील ७७ वर्षीय निवृत्त इंजिनिअरची तब्‍बल १० कोटींची फसवणूक झाल्‍याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्‍याला गंडा घाणार्‍यांनी १९ दिवस डिजिटल अरेस्‍टमध्‍ये ठेवले होते, असा दावा त्‍यांनी केला आहे.

नेमकं काय घडलं?

या प्रकरणी 'टाईम्‍स ऑफ इंडिया'ने दिलेल्‍या वृत्तात म्‍हटले आहे की, ७७ वर्षीय निवृत्त इंजिनिअर नवी दिल्‍लीतील रोहिणी परिसरात राहतात. ते मोबईल फोनवर येणारे कोणताही अनोळखी क्रमांकावरील फोन घेत नाहीत;पण काही दिवसांपूर्वी त्‍यांना एका अनोळखी नंबरवरुन फोन आला. त्‍यानं दुर्दैवाने तो फोन घेतला. एक कुरिअर कंपनीतून बोलत असल्‍याचे त्‍यांना बोलणार्‍या व्‍यक्‍तीने सांगितले.

कशी झाली फसवणूक?

फोनवरुन बोलणार्‍या व्‍यक्‍तीने निवृत्त इंजिनिअरला तुम्‍ही मुंबईहून चीनला पाठवलेले पार्सल परत आल्‍याचे सांगितले.आपण कोणतेही कुरिअर पाठवलेले नाही, असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. मात्र या पार्सलमध्‍ये तुमचे आधार कार्ड तपशील आहेत, असा दावा करत आम्‍ही व्‍हिडिओ कॉल मुंबई पोलिसांशी जोडत असल्‍याची बतावणी करण्‍यात आली. यावेळी व्‍हिडिओ कॉलवर दिसत असणारीय व्‍यक्‍ती मुंबई पोलिसांच्या लोगोसमोर बसलेला दिसली. त्याने पार्सल न पाठवल्याबद्दलच्या दाव्यांची पडताळणी करण्यासाठी बँक तपशील आवश्यक असल्‍याचे सांगितले. त्यानंतर कॉल दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करण्यात आला. त्‍या व्‍यक्‍तीने आपली ओळख सीबीआयचा वरिष्ठ अधिकारी अशी करुन दिली. त्‍याने निवृत्त इंजिनिअर यांना घरातील एका खोलीत जाण्‍याचीही सूचना केली. तसेच हा प्रकार घरात अन्‍य कोणाला सांगितल्‍यास त्‍यांनाही डिजिटल अरेस्‍ट होईल, अशी धमकी देत नजरकैदतच ठेवण्‍यात आले. तब्‍बल २५ सप्‍टेंबर ते १४ ऑक्‍टोबर, असा १९ दिवस हा फसवणुकीचा प्रकार सूरु होता. या दिवसांमध्‍ये सीबीआय, सक्‍तवसुली संचालनालय (ईडी) असे अधिकारी असल्‍याचे भासवून ज्‍येष्‍ठ नागरिकाच्‍या मेंदूवर आणि शरीरावर पूर्ण ताबा मिळवण्‍यात आला होता. 25 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबरपर्यंत घोटाळेबाजांनी चौकशी सुरू ठेवत इंजिनिअरला पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्‍यांनी तीन टप्प्यांत तब्‍बल 10.3 कोटी रुपये ट्रान्सफरही केले.

कसा झाला 'डिजिटल अरेस्‍ट'चा पदार्फाश?

निवृत्त इंजिनिअरला सांगण्‍यात आले की, चौकशीत त्‍यांच्‍या भावाचेही नाव समोर आले आहे. भावाला निरोप द्‍या अन्‍यथा त्‍यांनाही ताब्यात घेण्‍यात येईल, अशी धमकी देण्‍यात आली. ते याची माहिती देण्‍यासाठी भावाकडे गेले असता त्‍यांना आपली फसवणूक झाल्‍याचे लक्षात आले. यानंतर त्‍यांनी त्यांनी रोहिणी जिल्हा पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार दाखल केली.आता या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांचे IFSO युनिट करत आहे.

आयुष्‍यरभराच्‍या कमाईवर डल्‍ला

माझ्या कुटुंबाशी आणि पोलिसांशी या घटनेबद्दल बोलायला मला वेळ मिळाला होता; पण मी घाबरलो होतो. माझी पत्नीही घाबरली होती. तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मी केलेली सर्व गुंतवणूक माझ्‍या बँक खात्‍यातून गायब झाली होती. मी आयुष्‍यभर केलेली १० कोटी रुपयांची बचतीवर सायबर गुन्‍हेगारांनी डल्‍ला मारला, असे निवृत्त इंजिनिअर यांनी आपल्‍या तक्रारीत म्‍हटलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news