file photo
Latest
Earthquake in Ladakh : लडाखच्या कारगीलमध्ये 3.4 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के
पुढारी ऑनलाईन डेस्क : लडाखच्या कारगिलमध्ये आज रात्री १०:५५ वाजताच्या सुमारास भुकंपाचे धक्के जाणवले. 3.4 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे हे धक्के होते. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने या भुकंपाची माहिती दिली आहे. (Earthquake in Ladakh)
लडाखमध्ये आज (६ एप्रिल) रात्री ३.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार, रात्री १०:५५ च्या सुमारास लडाखच्या कारगिल भागात भूकंपाचा धक्का बसला. यापूर्वी जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात ३.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. (Earthquake in Ladakh)

