‘तिहार’ मधील पहिला दिवस…सकाळी ध्यान, नाश्त्यात चहा अन् ब्रेड | पुढारी

'तिहार' मधील पहिला दिवस...सकाळी ध्यान, नाश्त्यात चहा अन् ब्रेड

नवी दिल्‍ली ; पुढारी ऑनलाईन दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तिहार तुरूंगात आहेत. १४ फूट लांब आणि ८ फूट रूंद बॅरेकमध्ये ते खूप अस्‍वस्‍थ दिसले. त्‍यांनी पहिल्‍या रात्री जास्‍त वेळपर्यंत टीव्हीही पाहिला नाही. ते बॅरेकमध्ये ठेवलेल्‍या खुर्चीवर बराचवेळपर्यंत विचार करत बसलेले दिसून आले. सकाळ-सकाळी त्‍यांना चहा आणि नाश्ता देण्यात आला.

तिहारच्या जेल नंबर २ मध्ये मुख्यमंत्री केजरीवाल यांची पहिली रात्र अस्‍वस्‍थतेत गेली. सांगितलं जात आहे की, केजरीवाल यांनी पहिल्‍या रात्री एक एप्रिल रोजी तिहार कारागृहामध्ये घरचे जेवण घेतले. ते रात्री उशीरापर्यंत जागे राहिले  आणि पूर्ण रात्रभर ते अस्‍वस्‍थच असल्‍याचे दिसून आले. केजरीवाल यांच्या बॅरेकच्या लोखंडी ग्रीलमध्ये मच्छरदानी लावण्यात आली, यामुळे त्‍यांना डासांचा त्रास झाला नाही. देशाच्या इतिहासात ही पहिली वेळ आहे जेंव्हा एका विद्यमान मुख्यमंत्र्याला कारगृहात जावे लागले आहे. त्‍यात ज्‍या तिहार कारागृहात केजरीवाल बंद आहेत, ते कारागृह दिल्‍ली सरकारच्या अखत्‍यारीत येते.

आज केजरीवाल स्‍व:तहा लवकर उठले. सकाळी ६:४० वाजता त्‍यांना नाश्ता आणि चहा देण्यात आला. केजरीवाल यांनी सकाळी दिड तासापर्यंत आपल्‍या बरॅकमध्ये ध्यान केले आणि योग केला. दुपारच्या जेवणानंतर त्‍यांना पुन्हा १२ वाजता त्‍यांना आपल्‍या बरॅकमध्ये जावे लागणार आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत तेथेच रहावे लागेल. त्‍यांना डायबेटीज असल्‍याचे कारण लक्षात घेता केजरीवाल यांनी शुगर सेंसर आणि ग्‍लूकोमीटर, इसबगोल आणि अचानक शुगर कमी झाल्‍यास जेल सुपरिटेंडेंट यांना त्‍यांना टॉफी देण्यास सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : 

Back to top button