केजरीवाल प्रकरणात भारताने अमेरिकेचे कान टोचले | पुढारी

केजरीवाल प्रकरणात भारताने अमेरिकेचे कान टोचले

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ईडीने केलेल्या अटकेचा संदर्भ असलेल्या “भारतातील काही कायदेशीर कार्यवाहींबद्दल” अमेरीकेच्या (यूएस)च्या प्रवक्त्याच्या वक्तव्यावर भारताने बुधवारी “तीव्र” आक्षेप घेतला. परराष्ट्र मंत्रालयाद्वारे स्पष्ट करण्यात आले की, “मुत्सद्देगिरीमध्ये राज्यांनी इतरांच्या सार्वभौमत्वाचा आणि अंतर्गत बाबींचा आदर करणे अपेक्षित आहे. सहकारी लोकशाहीच्या बाबतीत ही जबाबदारी अधिक आहे. भारतातील कायदेशीर प्रक्रिया स्वतंत्र न्यायव्यवस्थेवर आधारित आहेत जी वस्तुनिष्ठ आणि वेळेवर निकालासाठी वचनबद्ध आहे. त्यावर शंका व्यक्त करणे चुकीचे आहे,” असेही परराष्ट्र मंत्रालयाद्वारे सांगण्यात आले.

सोमवारी, अमेरीकेच्या प्रवक्त्याने सांगितले होते की, अमेरिका केजरीवाल यांच्या अटकेच्या वृत्ताचे बारकाईने पालन करत आहे आणि निष्पक्ष कायदेशीर प्रक्रियेस प्रोत्साहित करत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला बोलवुन भारत सरकारची प्रतिक्रिया कळवण्यात आली. दरम्यान, मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले अरविंद केजरीवाल यांना २८ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. आता केजरीवाल यांना २८ मार्च रोजी दुपारी २ वाजता न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Back to top button