Lok Sabha Election : ही’ निवडणूक ठरली आणीबाणीचे कारण | पुढारी

Lok Sabha Election : ही’ निवडणूक ठरली आणीबाणीचे कारण

1971 मध्ये देशात पाचवी लोकसभा निवडणूक झाली. त्यावेळी इंदिरा गांधी बरेलीमधून निवडणूक लढवत होत्या. राज नारायण सिंह यांनी संयुक्त सोशालिस्ट पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. 10 मार्चला निकाल लागला. इंदिरा गांधी यांनी राज नारायण यांना एक लाखापेक्षाही अधिक मतांनी हरवले होते! राज नारायण यांनी इंदिरा गांधी यांच्याविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात अपील केले. ( Lok Sabha Election )

संबंधित बातम्या 

इंदिरा गांधी यांनी निवडणूक जिंकण्यासाठी सरकारी अधिकार्‍यांची मदत घेतली असा आरोप होता. न्यायालयात आढळले, की 1 फेब्रुवारी 1971 ते 25 फेब्रुवारी 1971 या काळात इंदिरा गांधी यांनी सरकारी अधिकार्‍यांची मदत घेतली. ‘रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल अक्ट’च्या सेक्शन 123 (7) चे हे उल्लंघन असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्यामुळे इंदिरा गांधी यांची निवड रद्द ठरवून त्यांच्यावर सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली. हा निकाल आल्यानंतर 25 जून 1975 मध्ये इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी पुकारली! आणीबाणी हटवल्यानंतर 1977 मध्ये देशात पुन्हा निवडणुका झाल्या. त्यावेळी राज नारायण यांनी बरेलीमधूनच इंदिरा गांधी यांचा पराभव केला. ( Lok Sabha Election )

Back to top button