Crime News : अंडाकरी केली नाही म्हणून लिव्ह-इन पार्टनरचा चेहरा ठेचून निर्घृण खून | पुढारी

Crime News : अंडाकरी केली नाही म्हणून लिव्ह-इन पार्टनरचा चेहरा ठेचून निर्घृण खून

पुढारी ऑनलाईन डेस्क : जेवणात अंडाकरी केली नाही, म्हणून लिव्ह-इन पार्टनरचा हातोडा आणि बेल्टने मारहाण करून निर्घृण खून झाल्‍याची भयंकर घटना मंगळवारी (दि.१२) रात्री दिल्लीतील पालम विहार येथील एका बांधकाम साईटवर घडली. या प्रकरणी संशयिताला शनिवारी दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. लल्लन यादव (वय ३५, रा. मधेपुरा, बिहार) असे आराेपीचे नाव आहे. (Crime News)

याप्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, बिहारमधील मधेपुरा येथील लल्लन यादव सहा वर्षांपूर्वी आपल्या कुटुंबाशी झालेल्या वादानंतर दिल्लीत आला होता. त्यांच्या पत्नीचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी लल्लन याची अंजली (वय ३२) हिच्याशी दिल्लीत भेट झाली. दोघे प्रेमात पडले. ते गुडगावमध्ये एकत्र राहू लागले. मंगळवारी रात्री लल्‍लन मद्यधुंद अवस्थेत घरी आला. त्याने अंजलीला जेवणासाठी अंडाकरी करण्यास सांगितले. अंजलीने अंडी शिजविण्यास नकार दिला. त्याने तिच्याशी वाद घालण्यास सुरूवात केली. चिडलेल्या लल्लनने अंजलीला हातोड्याने आणि बेल्टने मारहाण करून खून केला. अत्‍यंत निर्घृणपणे त्‍याने तिच्‍या चेहऱ्यावर हाताेड्याने वार केले.  यानंतर ताे घटनास्‍थळावरुन पसार झाला. Crime News

चोमा परिसरातील एका बांधकाम साईटवर बुधवारी (दि.१३) विकृत चेहऱ्याच्या महिलेचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी लल्लनला शनिवारी (दि.१६) दिल्लीतील सराय कालेखान परिसरातून पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

Crime News  : कंत्राटदाराकडून लल्लन-अंजलीच्या राहण्याची सोय

१० मार्च रोजी हे जोडपे इतर लोकांसह दिल्लीहून गुडगावला कामासाठी आले होते. त्यांना राहण्यासाठी दुसरी जागा नसल्याने कंत्राटदाराने त्यांना बांधकामाच्या ठिकाणी राहण्याची सोय करून दिली होती. मंगळवारी रात्री अंजली आणि लल्लन यांच्यामध्ये जेवणावरून भांडण झाले. त्यानंतर तिचा मारहाण करून खून केला. अटकेच्या भीतीने लल्लन घटनास्थळावरून पळून गेला होता. मात्र, पोलिसांनी त्याचा माग काढला. महिलेच्या हत्येसाठी वापरलेला हतोडा आणि बेल्ट जप्त करण्यात आले आहे, असे पोलीस इन्स्पेक्टर करमजीत सिंग यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button