

पुढारी ऑनलाईन डेस्क : 12वी फेल चित्रपटाच्या माध्यमातून घराघरात पोहचलेल्या IPS अधिकारी डॉ. मनोज कुमार शर्मा यांनी इस्टाग्रामवरून एक आनंदाची माहिती शेअर केले आहे. शर्मा यांनी प्रमोशन झाल्याची माहिती इंन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये दिली आहे. आयजी पदी झालेल्या त्यांच्या प्रमोशनानंतर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातआहे.
या चित्रपटाचे प्रेरणास्थान आयपीएस अधिकारी मनोज शर्मा यांना प्रमोशन मिळाले आहे. कारकिर्दीच्या महत्त्वपूर्ण कामगिरीमध्ये, IPS अधिकारी मनोज कुमार शर्मा यांना महाराष्ट्र पोलिसातील उपमहानिरीक्षक (DIG) वरून महानिरीक्षक (IG) पदावर बढती देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (ACC) 2003, 2004 आणि 2005 बॅचच्या IPS अधिकाऱ्यांच्या पदोन्नती मंजूर केल्यानंतर मनोज शर्मा यांच्या कारकिर्दीतील ही प्रगती झाली आहे.
मनोज शर्माने आपल्या प्रमोशनच्या माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे देत आनंद व्यक्त केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर ही माहिती शेअर करताना, त्यांनी भारतीय पोलीस सेवेतील आपल्या परिवर्तनाच्या प्रवासाबाबत माहिती दिली. त्यांनी या पोस्टमध्ये लिहीले आहे की, ASP पासून सुरू झालेला प्रवास आज भारत सरकारच्या आयजी होण्यापर्यंत पोहोचला आहे. या प्रदीर्घ प्रवासात मला साथ दिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.