

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू आणि काश्मीरमध्ये वर्षभरात ७५ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. चकमकीत ठार झालेले ६० टक्के दहशतवादी पाकिस्तानी नागरिक होते, अशी माहिती लष्कराच्या सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांमध्ये केवळ चार स्थानिक तरुण सहभागी झाल्याचेही लष्कराने स्पष्ट केले आहे.
या वर्षी जम्मू-काश्मीरमध्ये वेगवेगळ्या चकमकीत आणि शोध मोहिमेत सुमारे 75 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यशस्वी झाली आहे. पाकिस्तानने गेल्या वर्षभरापासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाला खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला आहे, जम्मू प्रदेशातील राजौरी, पूंछ, डोडा, किश्तवार, कठुआ आणि रियासी या जिल्ह्यांसह या भागात पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या कारवायांना अतिरिक्त जवान तैनात करत न आळा घालण्यात आला आहे. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि लेफ्टनंट जनरल एमव्ही सुचेंद्र कुमार यांच्या नेतृत्त्वाखालील सैन्यदल दहशतवाद्यांचा खात्मा करण्यावर लक्ष केंद्रित करत असल्याचेही लष्कराच्या सूत्रांनी स्पष्टकेले आहे.
अर्थ भारतीय सुरक्षा दल दर पाच दिवसांनी एका दहशतवाद्याचा खात्मा करत आहेत. आतापर्यंत मारल्या गेलेल्या ७५ पैकी बहुतांश विदेशी दहशतवादी होते. यामध्ये नियंत्रण रेषा (एलओसी) आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर (आयबी) घुसखोरीचा प्रयत्न करताना १७ दहशतवादी मारले गेले. तर चकमकीत २६ दहशतवादी ठार झाले आहेत. वाढत्या दहशतवादी धोक्याला आळा घालण्यासाठी सुरक्षा दलांच्या कारवाया महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत.