‘पीएम मोदी हिंदू नाहीत’, वादग्रस्त विधानप्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्यावर गुन्हा दाखल

‘पीएम मोदी हिंदू नाहीत’, वादग्रस्त विधानप्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्यावर गुन्हा दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क :  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 'हिंदू' नसल्याचे वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात सोमवारी (दि. ४) गुन्हा दाखल करण्य़ात आला आहे. भाजप प्रवक्ते कृष्ण सिंह यांच्या तक्रारीनंतर गांधी मैदान पोलिसांत ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

भारतीय जनता युवा मोर्चाचे (बीजेवायएम) राज्य प्रवक्ते, कल्लू म्हणून ओळखले जाणारे कृष्ण सिंह यांनी रविवारी (दि. ४) रात्री पाटणा येथील गांधी मैदान पोलीस ठाण्यात लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. आज (दि. ४) या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गांधी मैदान पोलिस स्टेशनचे एसएचओ सीताराम कुमार म्हणाले, "आम्ही लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news