प्रफुल पटेल यांचा पूर्वीच्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा मंजूर

File Photo
File Photo
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते प्रफुल्ल पटेल यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा मंजूर करण्यात आला. या महिन्याच्या सुरुवातीला संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पुन्हा निवडून आल्यानंतर पूर्वीच्या राज्यसभा सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला होता.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचा साडेचार वर्षांचा कालावधी बाकी होता. जुलै २०२२ मध्ये ते यापूर्वी राज्यसभेवर निवडून आले होते. असे असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने त्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवले. त्यामुळे त्यांनी पूर्वीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. पटेल यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकेला सामोरे जावे लागेल, त्यामुळे त्यांना नव्याने राज्यसभेत आणल्याचे बोलले जात आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या राज्यसभेतील रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक घोषित होईल. या ठिकाणी पुन्हा आपलाच उमेदवार निवडून आणण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा प्रयत्न असेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news