Bunty Bains : प्रसिद्ध संगीतकार बंटी बेन्स यांच्यावर पंजाबमध्ये गोळीबार; सिद्धू मुसेवालाच्या निकटवर्तीयावरील हल्ल्याने खळबळ
पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाबी संगीतकार आणि गीतकार बंटी बेन्स (Bunty Bains) यांच्यावर आज (दि. २७) पंजाबमधील मोहाली येथे गोळीबार झाला. सुदैवाने बेन्स यांना कोणतही इजा नाही. शहरातील सेक्टर 79 येथील एका रेस्टॉरंटमध्ये असताना हा हल्ला झाला.
पंजाबमधील मोहाली येथील एका रेस्टॉरंटमध्ये बसले बंटी बेन्स यांच्यावर हा हल्ला झाला. अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केल्याने खळबळ उडाली. सुदैवाने यामध्ये त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. बेन्स यांनी या घटनेची पोलिसात तक्रार दिली आहे.
फोनवर दिली धमकी, एक कोटींची मागणी
बंटी बेन्स यांनी आज तकला दिलेल्या माहितीनुसार, गोळीबाराच्या घटनेनंतर त्यांना धमकीचा फोन आला होता. ज्यामध्ये एक कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. पैसे न दिल्यास जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. हा कॉल मोस्ट वॉन्टेड गँगस्टर लकी पटियालच्या नावाने करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. लकी पटियाल कॅनडात राहतात. तो लॉरेन्स बिश्नोईचा विरोधक असून एका कुख्यात गँगचे नेतृत्व करत असल्याचे सांगितले जात आहे.

