Chandigarh New mayor | सर्वोच्च न्यायालयाचा भाजपला दणका; ‘आप’चे कुलदीप कुमार चंदीगडचे महापौर | पुढारी

Chandigarh New mayor | सर्वोच्च न्यायालयाचा भाजपला दणका; 'आप'चे कुलदीप कुमार चंदीगडचे महापौर

पुढारी ऑनलाईन डेस्क: चंदीगड महापौर निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज (दि.२० हस्तक्षेप करत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. चंदीगड महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी AAP उमेदवाराला वैधरित्या निवडून आलेला उमेदवार घोषित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने महानगरपालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे ‘आप’चे कुलदीप कुमार हे आता चंदीगडचे नवीन महापौर असणार आहेत, असे स्पष्ट झाले आहे. (Chandigarh New mayor)

सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत चंदीगड प्रशासाने आप आणि काँग्रेसच्या उमेदवाराची अवैध ठरवलेली‘ती’ ८ मते वैध असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. तसेच अवैध ८ मतपत्रिकांमध्ये AAP महापौर उमेदवार कुलदीप कुमार यांच्याच बाजूने मते पडल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान स्पष्ट केले. त्यामुळे ‘आम आदमी पार्टी’चा उमेदवारच चंदीगड महानगरपालिकेचा महापौर असल्याचे न्यायालयाने घोषित केले आहे. (Chandigarh New mayor)

सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारचा पर्दाफाश- आपचा हल्लाबोल

दिल्लीचे मंत्री, आप नेते सौरभ भारद्वाज या निकालावर म्हणतात, “जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष, भाजप महापौरपदाच्या निवडणुकीत कॅमेऱ्यावर गैरव्यवहार करताना दिसला. ही देशासाठी चिंतेची बाब आहे. मग तिथे पक्ष काय करत असेल? तिथेतर कॅमेरा आणि मायक्रोफोनही नाहीत? त्या सर्व ठिकाणी केंद्र सरकारवर विश्वास कसा ठेवायचा? असा सवाल देखील भारद्वाज यांनी केंद्रीय यंत्रणा आणिभाजपवर केला आहे. चंदीगड महापौर निवडणुक प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारचा पर्दाफाश केला आहे. केंद्र सरकारच्या सर्वोच्च वकिलांनी पीठासीन अधिकाऱ्याची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडल्याचेही त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

मतपत्रिका, मतमोजणी व्हिडिओचा आधार घेत SC चे निर्देश

चंदीगड महापौर मतदान, मतमोजणी आणि निकालादरम्यान ‘घोडेबाजार’ झाल्याचा आरोप ‘आप’ने केला होता. या निकालाविरोधात ‘आप’ने  सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यानंतर सुनावणीवेळी  न्यायालयाने चंदीगड प्रशासनाला फटकारले. त्यानंतर येथील प्रशासनाला मतपत्रिका आणि मतमोजणी दरम्यानचे व्हिडिओ सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रशासनाने हे पुरावे सादर केले. यानंतर न्यायालयाने आज (दि.२०) पुन्हा सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने ‘ती’ ८ मते वैध ठरवत फेरमतमोजणीचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. (Chandigarh New mayoral)

पीठासन अधिकाऱ्यावर कारवाई करा-न्यायालय

चंदीगड महापौरपदाच्या निवडणुकीत मतमोजणी प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप करत ‘आप’ने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने महापौर निवडणूक निर्णय अधिकारी अनिल मसिह यांना फटकारले. निवडणुकीतील पीठासन अधिकारी अनिल मसिह निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच मतपत्रिका आणि मतमोजणी दरम्यानचे व्हिडिओ सादर करून यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.

हेही  वाचा:

Back to top button