Farmer Protest Update : एमएसपीवर ४ पिके खरेदी करण्यास केंद्र सरकारची तयारी : पियुष गोयल | पुढारी

Farmer Protest Update : एमएसपीवर ४ पिके खरेदी करण्यास केंद्र सरकारची तयारी : पियुष गोयल

पुढारी ऑनलाईन डेस्क : शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी खूप सकारात्मक आणि दीर्घ चर्चा झाली आहे. सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यातील चर्चेची चौथी फेरी रात्री उशिरा संपली. या बैठकीत सरकारने शेतकऱ्यांसमोर ठेवलेल्या नवीन प्रस्तावानुसार, सरकारने एमएसपीवर चार पिके खरेदी करण्याचे मान्य केले आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. Farmer Protest Update

चंदीगडमध्ये रविवारी संध्याकाळी सुरू झालेली केंद्रीय मंत्री गोयल आणि शेतकरी नेत्यांमधील चर्चेची चौथी फेरी रात्री उशिरा संपली.
केंद्रीय मंत्री गोयल पुढे म्हणाले की, सरकारने NCCF (नॅशनल कन्झ्युमर को-ऑपरेटिव्ह फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड) आणि नाफेड (नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया) या सहकारी संस्थांना किमान आधारभूत किंमत (एमएसपी) दिली आहे. डाळ खरेदीसाठी शेतकऱ्यांशी पाच वर्षांचा करार करण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) एमएसपीवर कापूस पीक खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांसोबत ५ वर्षांचा करार करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. Farmer Protest Update

सरकारच्या प्रस्तावांवर शेतकरी नेते आपला निर्णय कळवतील, शेतकऱ्यांशी सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा झाली. आम्ही सहकारी संस्था एनसीसीएफ आणि नाफेडला शेतकऱ्यांशी एमएसपीवर डाळ खरेदी करण्यासाठी पाच वर्षांचा करार करण्याचा प्रस्ताव दिला आहे. एमएसपीवर कापूस पीक खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांशी पाच वर्षांचा करार करा, असा प्रस्ताव आम्ही भारतीय कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) कडे दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.

Farmer Protest Update शेतकऱ्यांची मागणी काय ?

एमएसपीच्या कायदेशीर हमीशिवाय, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन आणि कर्जमाफी, लखीमपूर खेरी हिंसाचारातील पीडितांना न्याय, भूसंपादन कायदा 2013 पुनर्स्थापित करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली. गेल्या आंदोलनात मारल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्यात यावी,अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

दरम्यान, संयुक्त किसान मोर्चाने (एसकेएम) जाहीर केले की, शेतकऱ्यांच्या कायदेशीर मागण्या मान्य करण्यासाठी केंद्रावर दबाव आणण्यासाठी मंगळवारपासून तीन दिवस पंजाबमधील भाजप नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. एसकेएम नेते बलबीर सिंग राजेवाल म्हणाले की ते मंगळवार ते गुरुवार या कालावधीत भाजपच्या खासदार, आमदार आणि जिल्हा युनिट अध्यक्षांसह नेत्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात येईल.

हेही वाचा 

Back to top button