Bharat Rice Launched : केंद्र सरकारकडून महागाईवर खुशखबर! स्वस्तातला ‘भारत तांदूळ’ लॉन्च | पुढारी

Bharat Rice Launched : केंद्र सरकारकडून महागाईवर खुशखबर! स्वस्तातला 'भारत तांदूळ' लॉन्च

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही दिवसांपासून ‘भारत राईस’ची जोरदार चर्चा होती. सर्वसामान्यांना महागाईत दिलासा देण्यासाठी आज हा तांदूळ सरकारने लॉन्च केला आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या या तांदळाची प्रतिक्षा आता संपलेली आहे. दिल्लीतील कर्तव्य पथावर आज (दि. ६) हा ‘भारत तांदूळ’ लाँच करण्यात आला आहे. पीआयबीने याबाबतची एक्स पोस्ट करुन या नव्या तांदळाच्या किंमतीबाबत माहिती दिली आहे. (Bharat Rice Launched)

केंद्रीय अन्न मंत्री पियुष गोयल यांनी या नव्या तांदळाबाबत माहिती दिलेली होती. आज हा तांदुळ लॉन्च करुन याच्या उपलब्धेबाबत आणि किमतीबाबत माहिती पीआयबीने एक्स पोस्टद्वारे दिली आहे.या स्वस्त भारत तांदळाची विक्री सुरू करण्यात आली असून 5Kg आणि 10Kg पॅकिंगमध्ये हा तांदुळ उपलब्ध असणार आहे. तसेच  29/kg असा याचा दर असणार आहे. अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. Bharat Rice Launched

पीआयबीने केलेल्या पोस्टवर लिहीले आहे की, ‘भारत तांदूळ’ केंद्रीय भंडार, भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघाच्या भौतिक आणि मोबाईल आउटलेटवर उपलब्ध असेल. नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया (NCCF) यांच्याद्वारे संयुक्तरित्या ही स्वस्त तांदूळ देण्याची मोहिम राबवण्यात येणार आहे.

हेही वाचा

Back to top button