अमेरिकेतून परत पाठवलेल्या 73 वर्षीय आजींना अमानुष वागणूक : अधिकाऱ्यांमुळे बसला धक्का

कॅलिफोर्नियाच्या रहिवासी हरजीत कौर यांची व्यथा : ‘माझे येथे कोणी नाही, कुठे राहणार?’
73-year-old-grandmother-returns-from-us-experiences-inhumane-treatment
अमेरिकेतून परत पाठवलेल्या 73 वर्षीय आजींना अमानुष वागणूक : अधिकाऱ्यांमुळे बसला धक्काPudhari File Photo
Published on
Updated on

चंदीगड; वृत्तसंस्था : अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे दीर्घकाळ वास्तव्यास असलेल्या हरजीत कौर (73) यांना गुरुवारी भारतात हद्दपार करण्यात आले. अमेरिकेच्या अधिकार्‍यांनी त्यांना दिलेल्या अमानुष वागणुकीमुळे त्या अजूनही धक्क्यात आहेत.

Summary
  • हरजीत कौर (73) यांना नियमित इमिग्रेशन भेटीदरम्यान ताब्यात घेण्यात आले आणि भारतात हद्दपार केले.

  • अटकेनंतर रात्रभर बसवून ठेवले आणि हातकड्या लावल्याने त्यांना अमानुष वागणूक मिळाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

  • त्यांना अस्वच्छ कपडे देण्यात आले आणि शाकाहारी असूनही त्यांना जेवण मिळाले नाही.

गुरुवारी रात्री उशिरा मोहाली येथील आपल्या बहिणीच्या घरी पोहोचल्यानंतर कौर यांनी सांगितले की, भारतात त्यांचे कोणीही नाही. मी कुठे राहणार? माझे येथे काहीच नाही. माझ्या पतीच्या नातेवाईकांनी घर आणि जमीन विकून टाकली आहे, असे त्यांनी सांगितले. स्वतःची व्यथा सांगताना कौर यांनी स्पष्ट केले की, 8 सप्टेंबर रोजी सॅन फ्रान्सिस्को येथे इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंटसोबतच्या नियमित भेटीदरम्यान त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास नकार दिला, तरी त्यांना अटक करण्यात आली. यानंतर त्यांना संपूर्ण रात्र बसवून ठेवण्यात आले आणि दुसर्‍या दिवशी सकाळी युबा काऊंटी येथील सुविधेत हलवण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news