

गुगलमध्ये नोकरी करण्याची संधी मिळावी अशी अनेकांची इच्छा असते. शिकण्याची भरपूर संधी, उत्तम पगार, जोडीने इतर सुविधा, वर्क कल्चर इत्यादी अनेक कारणांमुळे गुगलमध्ये नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. इंजिनिअर, एमबीए, कंटेट अशा विविध क्षेत्रातील शिक्षण घेतलेल्यांना गुगलमध्ये नोकरी मिळू शकते.
गुगलमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी गुगुलने स्वतंत्र साईट बनवलेली आहे. https://careers.google.com/ अशी ही साईट आहे.
या साईटवर गेल्यानंतर पहिल्यांदा लॉगिन करावे लागते. आपले जे जीमेलचे लॉगिन आहे, त्याच लॉगिन यासाठी वापरायचे असते.
गुगलमध्ये नोकरीसाठी जगभरातून काही लाखांत अर्ज येत असतात. त्यामुळे गुगलने एका व्यक्तीने किती वेळा नोकरीसाठी अर्ज करावा यासाठी काही निर्बंध घातले आहेत. ३० दिवसांत जास्तीजास्त ३ वेळाच तुम्ही अर्ज करू शकता. त्यामुळे अर्ज करत असताना जॉब डिस्क्रिप्शन नीट पाहून आपला प्रोफाईल मॅच होत असेल तरच अर्ज करावा.
वरील वेबसाईट ओपन केल्यानंतर रोल आणि लोकेशन अशा दोन प्रकारे जॉब शोधता येतो. त्यानंतर संबंधित जॉबवर क्लिक करून अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. गुगलमध्ये जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी सतत व्हॅकन्सी असतात. त्यामुळे या साईटवर नियमित लक्ष ठेवले तर आपल्या प्रोफाईलला मॅच होईल असा जॉब मिळू शकतो.