राहुल गांधी यांची मोठी घोषणा! सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना करणार | पुढारी

राहुल गांधी यांची मोठी घोषणा! सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना करणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : नागपूरमध्ये आज (दि. २८) काँग्रेसचा वर्धापन दिन सोहळा पार पडला. या सभेत सभेत बोलत असताना माजी अध्यक्ष खासदार राहूल गांधी यांनी देशातील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती याबाबत चिंता व्यक्त केली. आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर जातनिहाय जनगणना करणार असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले.

काँग्रेसच्या १३९ व्या स्थापना दिनी नागपूरच्या ‘भारत जोडो’ मैदानात जाहीर सभेला राहुल गांधी संबोधित करत होते.  देशात दोन विचार धारांची लढाई सुरु असल्याची सांगितले. विचार आणि सत्तेची ही लढई आहे. आमचे सरकार आल्यानंतर सर्व परिस्थिती बदलेल. शिक्षण, बेरोजगारी आणि स्थिरता यावर आमचं सरकार लक्ष देईल तसेच देशात आमचं सरकार आल्यानंतर जातनिहाय जनगणना करेल असे अश्वासनही राहूल गांधी यांनी दिले.

ते पुढे म्हणाले की, केंद्रात सत्ता आल्यापासून नरेंद्र मोदी यांनी सर्व सरकारी यंत्रणांवर कब्जा केला आहे यातून मीडिया, निवडणूक आयोग, न्यायालयेही सुटली नाहीत. दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याचे आश्वास दिले होते पण १० वर्षात मोदींनी किती लोकांना रोजगार दिला? देशात आज ४० वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी आहे. नोकरी नसल्याने कोट्यवधी तरुणांची शक्ती वाया जात आहे. शेतकरी, तरुण संकटात आहे तर दुसरीकडे देशातील दोन-चार उद्योगपतींकडे देशातील सर्व संपत्ती सोपवली जात आहे. ओबीसी, दलित, मागासवर्गीयांना सत्तेत, प्रशासनात अत्यंत कमी वाटा मिळत आहे. सर्वच क्षेत्रात या समाज घटकांना कमी स्थान दिले जाते. काँग्रेस पक्षाने जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली त्यानंतर मोदींची भाषा बदलली व देशात गरिब ही एकच जात आहे असे ते बोलत आहेत. देशातील सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जावे लागणार आहे, हीच काँग्रेसची विचारधारा आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना करेल व देशातील तरुणांना रोजगाराची आवश्यकता आहे ते मोदी सरकार दे देऊ शकत नाही ते काम काँग्रेस पक्षच करेल. आपल्या मदतीने महाराष्ट्रात व देशात परिवर्तन आणू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Back to top button